'आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स'... अमृता फडणवीस यांच्या डान्सचं नेटीझन्सकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 09:12 IST2018-12-30T09:09:50+5:302018-12-30T09:12:50+5:30
अमृता फडणवीस या नेहमीच या-ना त्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी, बिग बी अमिताभ यांच्यासोबत गायलेलं गाण

'आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स'... अमृता फडणवीस यांच्या डान्सचं नेटीझन्सकडून कौतुक
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी पत्नी आणि महाराष्ट्राच्या 'फर्स्ट लेडी' अमृता फडणवीस यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी एका घरगुती लग्न समारंभात बाजीराव-मस्तानी चित्रपटातील 'मै दिवानी-मै मस्तानी' हो गयी, या गाण्यावर अफलातून डान्स केला. नेटीझन्सने अमृता फडणवीस यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे.
अमृता फडणवीस या नेहमीच या-ना त्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी, बिग बी अमिताभ यांच्यासोबत गायलेलं गाण, तर कधी मुंबई-गोवा बोट उद्घाटनावेळी काढलेला सेल्फी अमृता यांच्या चर्चेचाल विषय बनला होता. अर्थातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमृता यांची पाठराखण करताना, त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य असल्याचं म्हटलं होता. आता, पुन्हा एकदा अमृता फडणवीस आपल्या डान्समुळे सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत.
अमृता यांनी आपल्या फेसबुक आणि इंस्ट्राग्राम अकाऊँटवरुन डान्स करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये एका घरगुती कार्यक्रमातील आनंदाच क्षण असेही त्यांनी लिहिले आहे. बाजीराव-मस्तानी चित्रपटातील मै मस्तानी हो गई... या गाण्यावर अमृता यांनी दीपिका पदुकोणच्या स्टाईलने हुबेहुब डान्स केला आहे. अमृता यांच्या या डान्सचे नेटीझन्सने कौतूक केले आहे. अमृता Exellent peformance आणि keep it up अशा कमेंट करुन नेटीझन्सने अमृता फडणवीस यांना प्रोत्साहन दिले आहे.
पाहा व्हिडीओ -