राज्यभरात ३०० हून अधिक नवीन विधी महाविद्यालये; मुंबईत १५ महाविद्यालयांना मिळाली मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 11:45 AM2024-02-19T11:45:37+5:302024-02-19T11:46:10+5:30

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित नव्याने सुरू होणाऱ्या ३७ महाविद्यालयांपैकी १५ नवीन महाविद्यालये विधी शाखेची आहेत.

Over 300 new law colleges across the state 15 colleges got recognition in Mumbai | राज्यभरात ३०० हून अधिक नवीन विधी महाविद्यालये; मुंबईत १५ महाविद्यालयांना मिळाली मान्यता

राज्यभरात ३०० हून अधिक नवीन विधी महाविद्यालये; मुंबईत १५ महाविद्यालयांना मिळाली मान्यता

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित नव्याने सुरू होणाऱ्या ३७ महाविद्यालयांपैकी १५ नवीन महाविद्यालये विधी शाखेची आहेत. तीन आणि पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी या महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. भांडुप, बोरिवली, नालासोपारा, महाड, कल्याण, रत्नागिरी या ठिकाणी ही महाविद्यालये सुरू होणार आहेत.

विधी शाखेबरोबरच कला, विज्ञान, वाणिज्य, डेटा सायन्स, बायो टेक्नॉलॉजी, आयटी, अकाउंटिंग अँड फायनान्स आदी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्यात ३०० हून अधिक संस्थांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर नवीन महाविद्यालये सुरू करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे इरादा पत्र दिले जाणार आहे. ही नवीन महाविद्यालये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करता येतील. त्याआधी संस्थेला सरकारच्या अटी व शर्तीची पूर्तता करावी लागेल. त्यासंबंधीचा पूर्तता अहवाल मिळाल्यानंतर राज्य सरकार संस्थांना अंतिम मान्यता देईल. त्याशिवाय या महाविद्यालयांना विद्यापीठाची संलग्नताही मिळणार नाही.

विभागाने काही दिवसांपूर्वी २६४ नव्या महाविद्यालयांना इरादा पत्र देण्याचे आदेश दिले होते. त्यात सर्वाधिक ८२ महाविद्यालये एसएनडीटीला देण्यात आली आहे. त्यानंतर आणखी ४० हून अधिक संस्थांना इरादापत्र देण्यात आले आहे. यात मुंबईतील २३ महाविद्यालयांचा समावेश आहे. एसएनडीटी खालोखाल पुणे विद्यापीठाच्या ६० महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे.

नव्याने इरादापत्र मिळालेली महाविद्यालये (विद्यापीठनिहाय)

एसएनडीटी-८२
पुणे-६०
मुंबई-३७
अमरावती-३१
अमरावती-३१
 नांदेड-३२
 जळगाव-१६
 कोल्हापूर-११
 सोलापूर-५
 नागपूर-१४
 मराठवाडा-१२ 
गडचिरोली-५

या विषयांकरिता मान्यता

बीए, बीकॉम, बीएस्सी, डेटा सायन्स, एलएलबी (तीन आणि पाच वर्षे) बायो टेक्नॉलॉजी, आयटी, अकाउंटिंग अँड फायनान्स, बैंकिग अँड इन्शुरन्स, फायनॅन्शिअल मॅनेजमेंट, मल्टिमीडिया अँड मासकम्युनिकेशन, हॉस्पिटॅलिटी स्टडीज, कॉम्प्युटर सायन्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, होम सायन्स, क्लिनिकल लेबॉरेटरी सायन्स, वाणिज्य व व्यवस्थापन, एलएलबी (इंटरडिसिप्लिनरी) इत्यादी. 

Web Title: Over 300 new law colleges across the state 15 colleges got recognition in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.