Join us

राज्यात दिवसभरात ३५ हजारांहून अधिक रुग्णवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा वाढतोच आहे. गुरुवारी ३५ हजार ९५२ रुग्णांची नोंद झाली असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा वाढतोच आहे. गुरुवारी ३५ हजार ९५२ रुग्णांची नोंद झाली असून, १११ मृत्यू झाले आहेत. यापूर्वी, बुधवारी ३१ हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २६ लाख ८३३ झाली असून, मृतांचा आकडा ५३ हजार ७९५ आहे.

सध्या राज्यात २ लाख ६२ हजार ६८५ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दिवसभरात २०,४४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, राज्यात आतापर्यंत एकूण २२ लाख ८३ हजार ३७ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.७८ % एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८८,७८,७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.७८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,६२,८९९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर १३,७७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.०७% एवढा आहे. दिवसभरातील १११ मृत्यूंमध्ये मुंबई १३, ठाणे १, नवी मुंबई मनपा २, मीरा भाईंदर मनपा १, वसई विरार मनपा ७, पनवेल मनपा १, नाशिक ५, नाशिक मनपा ३, मालेगाव मनपा २, धुळे मनपा १, जळगाव २, जळगाव मनपा २, नंदुरबार ३, पुणे ४, पुणे मनपा १६, सोलापूर १, सांगली मिरज कुपवाड मनपा ३, परभणी मनपा ४, लातूर १, लातूर मनपा १, बीड ४, नांदेड मनपा १, अकोला १, अकोला मनपा २, बुलडाणा ४, वाशिम ३, नागपूर १०, नागपूर मनपा १४, चंद्रपूर १ इ. रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच

मुंबईत कोरोनाचा कहर सुरू असून, गुरुवारी पुन्हा एकदा ५ हजार ५०० रुग्ण आढळले असून, १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २४ मार्च रोजी ५ हजार १८५ रुग्णांची नोंद झाली होती. परिणामी, आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ८० हजार ११५ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ६२० झाला आहे. सध्या शहर उपनगरात ३३ हजार ९६१ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ८८ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७५ दिवसांवर आला आहे. १८ ते १४ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.८९ टक्का असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत दिवसभरात ४६ हजार ८६९ कोरोना चाचण्या झाल्या असून, आतापर्यंत ३८ लाख ४१ हजार ३६९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्स ४० असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ४५७ आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २६ हजार ६८२ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.

सक्रिय रुग्णांचा आलेख चढता

तारीख रुग्णसंख्या

२५ मार्च ३३,९६१

२४ मार्च ३०,७६०

२३ मार्च २७,६७२

२२ मार्च २५,३७२

२१ मार्च २३,४४८

रुग्ण दुपटीच्या कालावधीत घट

तारीख दिवस

२५ मार्च ७५

२४ मार्च ८४

२३ मार्च ९०

२२ मार्च ९७

२१ मार्च १०६

२० मार्च ११४

१९ मार्च १२४

१८ मार्च १३६

१७ मार्च १४५

१६ मार्च १५६

१५ मार्च १६५