मुंबई विमानतळावरून ३९ लाखांचे सोने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:24 AM2017-12-17T01:24:18+5:302017-12-17T01:24:23+5:30
दुबईतून मुंबईत सोने तस्करी सुरूच असल्याचे चित्र शुक्रवारी हवाई गुप्तचर विभागाने केलेल्या कारवाईतून समोर आले. दुबईतून मुंबईत आलेल्या अॅलुम्थोडी सुदीप या प्रवाशाकडून शुक्रवारी ३९ लाख ४० हजार किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.
Next
मुंबई : दुबईतून मुंबईत सोने तस्करी सुरूच असल्याचे चित्र शुक्रवारी हवाई गुप्तचर विभागाने केलेल्या कारवाईतून समोर आले. दुबईतून मुंबईत आलेल्या अॅलुम्थोडी सुदीप या प्रवाशाकडून शुक्रवारी ३९ लाख ४० हजार किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. सुदीपकडे भारतीय पासपोर्ट आहे.
शुक्रवारी दुबईवरून मुंबईकडे येणा-या जेट एअरलाइनच्या फ्लाइट क्रमांक ९ डब्ल्यू ०५४१ फ्लाइटने सुदीप मुंबई विमानतळावर उतरला. त्याच दरम्यान त्याच्या संशयास्पद हालचाली तपास यंत्रणांनी हेरल्या. त्याच्या झडतीत विदेशी मुद्रण असलेले १ हजार ४६४ गॅ्रम सोने जप्त करण्यात आले आहे. एका काळ्या रंगाच्या विशिष्ट प्रकारच्या चिकटपट्टीमध्ये हे सोने लपवून शर्टाच्या खिशात ठेवण्यात आले होते.