राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ४० हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:08 AM2021-09-22T04:08:05+5:302021-09-22T04:08:05+5:30

मुंबई : राज्यात सातत्याने दैनंदिन रुग्णसंख्येसह मृत्युंतही कमालीची घट होत आहे. त्यामुळे राज्यातील उपचाराधीन रुग्णसंख्येचा आलेखही घसरला आहे. सध्या ...

Over 40,000 active patients in the state | राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ४० हजारांवर

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ४० हजारांवर

Next

मुंबई : राज्यात सातत्याने दैनंदिन रुग्णसंख्येसह मृत्युंतही कमालीची घट होत आहे. त्यामुळे राज्यातील उपचाराधीन रुग्णसंख्येचा आलेखही घसरला आहे. सध्या राज्यात ४० हजार ७१२ रुग्ण उपचाराधीन आहेत, तर आतापर्यंत ६३ लाख ४४ हजार ७४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात मंगळवारी ३ हजार १३१ रुग्ण आणि ७० मृत्युंची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६५ लाख २७ हजार ६२९ झाली असून, मृतांची संख्या १ लाख ३८ हजार ६१६ इतकी आहे. राज्यात दिवसभरात ४ हजार २१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२ टक्के असून, मृत्युदर २.१२ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७३ लाख ७ हजार ८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११.३९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ७२ हजार ९८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ७०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Web Title: Over 40,000 active patients in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.