मुंबई : राज्यात सातत्याने दैनंदिन रुग्णसंख्येसह मृत्युंतही कमालीची घट होत आहे. त्यामुळे राज्यातील उपचाराधीन रुग्णसंख्येचा आलेखही घसरला आहे. सध्या राज्यात ४० हजार ७१२ रुग्ण उपचाराधीन आहेत, तर आतापर्यंत ६३ लाख ४४ हजार ७४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात मंगळवारी ३ हजार १३१ रुग्ण आणि ७० मृत्युंची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६५ लाख २७ हजार ६२९ झाली असून, मृतांची संख्या १ लाख ३८ हजार ६१६ इतकी आहे. राज्यात दिवसभरात ४ हजार २१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२ टक्के असून, मृत्युदर २.१२ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७३ लाख ७ हजार ८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११.३९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ७२ हजार ९८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ७०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.