मुंबई : मेल-एक्स्प्रेसची तिकिटे अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून त्याला रेल्वेकडून चाप लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. बुडत असलेला महसूल आणि प्रवाशांची होणारी लुबाडणूक पाहता पश्चिम रेल्वेवर गेल्या वर्षभरात अनधिकृत दलालांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. २०१६-१७ मध्ये तब्बल ५८८ प्रकरणांत ७०० दलालांना अटक करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. आॅनलाईन रेल्वे तिकिटे काढताना प्रवाशांना बराच वेळा वेटिंग लिस्टला सामोरे जावे लागते. गर्दीच्या हंगामात तर तिकीट मिळताना नाकेनऊ येतात. त्याचा फायदा घेत अनधिकृत तिकीट दलालांकडून प्रवाशांना हेरण्यात येते आणि जास्त दराने तिकीट विकली जातात. यात प्रवाशांची फसवणुकही होते. अशा दलालांविरोधात पश्चिम रेल्वेने २०१६-१७ मध्ये मोठी कारवाई केली आहे. केलेल्या कारवाईत १ कोटी २८ लाख ८४ हजार ८१० रुपये किंमतीची तिकीट हस्तगत करण्यात आली. (प्रतिनिधी)
पश्चिम रेल्वेवर वर्षभरात ७०० दलालांना अटक
By admin | Published: April 13, 2017 1:25 AM