Join us

कोरोना काळात वर्षभरात आठ लाखांवर वीज जोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना काळातही ग्राहकांना वीजविषयक सेवा सुरळीत व अविरतपणे देण्यात येत असून, गेल्या वर्षात सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना काळातही ग्राहकांना वीजविषयक सेवा सुरळीत व अविरतपणे देण्यात येत असून, गेल्या वर्षात सर्व वर्गवारीतील ८ लाख २ हजार ७८२ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या. नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने प्रलंबित वीजजोडण्या कार्यान्वित करा, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी दिले.

मागील वर्षी मार्च ते जूनपर्यंत कोरोनामुळे नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याचा वेग मंदावला होता. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील ८ लाख २ हजार ७८२ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. दरम्यान, महावितरणकडून दरवर्षी मागणीनुसार ९ ते १० लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात.

प्रादेशिक कार्यालयांना मार्चअखेरपर्यंत ३ लाख ३५ हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्यात आला. एप्रिलमध्ये सुमारे साडेतीन लाखांहून अधिक नवीन वीजमीटर पुरविण्याचे महावितरणचे नियोजन आहे.

* नवीन वीजजोडण्या खालीलप्रमाणे

कोकण : २ लाख ८५ हजार ३३२

पुणे : २ लाख २८ हजार ६९३

नागपूर : १ लाख ६५ हजार १८१

औरंगाबाद : १ लाख २३ हजार ५७१

-------------