गेल्या काही वर्षांत आपण अनेक पराभव बघितले; आता राजकीय चढ-उतार नको- अमित ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 07:10 PM2022-07-21T19:10:05+5:302022-07-21T19:15:02+5:30

आज अमित ठाकरे यांनी भिवंडीमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

Over the years we have seen many defeats; No more political ups and downs, Said That MNS Leader Amit Thackeray | गेल्या काही वर्षांत आपण अनेक पराभव बघितले; आता राजकीय चढ-उतार नको- अमित ठाकरे

गेल्या काही वर्षांत आपण अनेक पराभव बघितले; आता राजकीय चढ-उतार नको- अमित ठाकरे

googlenewsNext

मुंबई/भिवंडी- मनसेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाला सध्या जिल्ह्यात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मनसेच्या शाखांमध्ये जाऊन पक्षाला नवी उभारी देण्याचा प्रयत्न अमित ठाकरे करत आहेत. 

आज अमित ठाकरे यांनी भिवंडीमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तुम्हाला राज ठाकरे यांचा मनसे पक्ष वाढवायचा असेल तर सर्वात आधी स्वत:चा अहंकार बाजूला ठेवा आणि कामाला लागा, असं अमित ठाकरेंनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितलं.

पक्षाला वाढवा, तसेच पूर्ण ताकदीने निवडणुका लढवा, असं अमित ठाकरे महासंपर्क अभियानात भिवंडीत पक्ष पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाले. तसेच गेल्या काही वर्षांत आपण अनेक पराभव बघितले आहेत. आता मात्र यापुढे आपल्याला फक्त विजय बघायचा आहे. आता राजकीय चढ-उतार नको, फक्त चढ हवा, असं अमित ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत जिथं शिवसेना नेमकी कुणाची? यावरुन लढाई सुरू आहे. तर भाजपाला पुन्हा सत्तेत आल्यानं स्फुरण चढलं आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहिली जात आहे. पण अमित ठाकरे मात्र राज्यात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर लोकांच्या भेटीगाठी घेण्यात व्यग्र आहे.

मनसे राज्यातील सत्तासंघर्षापासून बरीच दूर आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे देखील शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत होते. तेही अजून फारसे काही बोलले नाहीत आणि सक्रिय देखील झालेले नाहीत. पण आपल्या पक्षाची बांधणी करण्याची धुरा अमित ठाकरेंनी घेतलेली दिसत आहे.

Web Title: Over the years we have seen many defeats; No more political ups and downs, Said That MNS Leader Amit Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.