मोलमजुरीतून केली पाणीटंचाईवर मात

By Admin | Published: March 15, 2015 01:11 AM2015-03-15T01:11:13+5:302015-03-15T01:11:13+5:30

खेडोपाडी पाणीबाणी दूर करण्यासाठी दरवर्षी शासनाकडून विविध योजना राबवल्या असल्या तरीही नागरिकांचे घसे कोरडेच राहतात. मु

Overcome the water shortage that has been done through the laboratory | मोलमजुरीतून केली पाणीटंचाईवर मात

मोलमजुरीतून केली पाणीटंचाईवर मात

googlenewsNext

सुधाकर वाघ - धसई
खेडोपाडी पाणीबाणी दूर करण्यासाठी दरवर्षी शासनाकडून विविध योजना राबवल्या असल्या तरीही नागरिकांचे घसे कोरडेच राहतात. मुरबाड तालुक्यात आजपर्यंत १८९ नळपाणीपुरवठा योजना मंजूर केल्या असल्या तरी गरीब आदिवासींना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. या पाणीसमस्येवर मात करण्यासाठी अखेर गेटाचीवाडीतील आदिवासींनीच पुढाकार घेऊन मोलमजुरी करून काही पैसे बाजूला काढले़ त्यातून गावात स्वत:च पाणीपुरवठा योजना सुरू करून टंचाईवर मात करून तालुक्यात नवा आदर्श घडवला आहे.
मुरबाड तालुक्यातील पाटगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गेटाचीवाडी हे १५० आदिवासींची वस्ती असलेले गाव आहे. येथील लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने पाणीपुरवठा योजना राबविल्या. त्यासाठी लाखो रु पये खर्चही केले गेले. मात्र, याचा त्यांना काहीही फायदा झाला नाही. अखेर, या वाडीतील आदिवासींनी एकत्र येऊन स्वखर्चाने पाण्याची सोय करण्याचे ठरविले. फार्महाऊसची कामे, घराच्या बांधणीची कामे तसेच हाताला मिळेल ते काम करून पोटाला चिमटा घेऊन पैसा जमा केला. श्रमदानाने व स्वत: काढलेल्या वर्गणीतून त्यांनी एक बोअरवेल बसविली, तसेच श्रमदानानेच एक किलोमीटर अंतरावरून पाण्याची पाइपलाइन गावात आणली आणि गावासाठी टाकी बसवली.
या योजनेसाठी त्यांना दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च आला. या योजनेमुळेआज घराजवळ २४ तास पाणी उपलब्ध असल्याने मैलभर पायी चालून डोक्यावरून पाणी आणण्याचा त्रास वाचल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पाणीटंचाईवर मात
आम्हाला अनेक वर्षे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असे़ मात्र, आता आम्ही गावकऱ्यांनी ही नळयोजना श्रमदानाने सुरू करून आम्ही पाणीटंचाईवर मात केली आहे, असे गेटाचीवाडीचे ग्रामस्थ दत्तू वाघ यांनी सांगितले.

Web Title: Overcome the water shortage that has been done through the laboratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.