मुलुंड ते माटुंगादरम्यान रात्रकालीन ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 05:19 AM2020-02-28T05:19:48+5:302020-02-28T05:20:09+5:30

शुक्रवार-शनिवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर आणि मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येईल.

Overnight block between Mulund to Matunga | मुलुंड ते माटुंगादरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मुलुंड ते माटुंगादरम्यान रात्रकालीन ब्लॉक

Next

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील विद्याविहार स्थानकाजवळील जुन्या पादचारी पुलाचे पाडकाम करण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवार-शनिवारी मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.

शुक्रवार-शनिवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर आणि मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येईल. या वेळी विद्याविहार स्थानकात क्रेनच्या साहाय्याने जुन्या पादचारी पुलाचे पाडकाम केले जाईल.

एलटीटी-भुवनेश्वर एक्स्प्रेस रात्री १२.१५ ऐवजी पहाटे ४.३० वाजता एलटीटीहून सुटेल. एलटीटी-मांडुवाडीह एक्स्प्रेस रात्री १२.३५ ऐवजी पहाटे ५ वाजता एलटीटीहून सुटेल. एलटीटी-मडगाव डबल डेकर रात्री १.१० ऐवजी पहाटे ५.१० वाजता एलटीटीहून सुटेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Web Title: Overnight block between Mulund to Matunga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.