पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 05:03 AM2020-01-11T05:03:38+5:302020-01-11T05:03:43+5:30
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान धिम्या मार्गावर रविवारी ब्लॉक असेल.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान धिम्या मार्गावर रविवारी ब्लॉक असेल. परिणामी कल्याण दिशेकडे जाणारी लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर येथे थांबणार नाही. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लॉक नसेल. मात्र शनिवारी-रविवारी रात्रकालीन ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
माटुंगा ते मुलुंड दरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर सकाळी १०.५९ ते दुपारी ३.५० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी माटुंगा येथून कल्याण दिशेकडे जाणारी धिमी लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येईल. ही लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबेल. मुलुंडपासून ही लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येईल. जलद मार्गावरील स्थानक उपलब्ध नसल्याने विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर या स्थानकांवर लोकल थांबणार नाही.
हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दोन्ही दिशेकडील (नेरूळ/बेलापूर-खारकोपर मार्गासहित) सकाळी ११.३० ते दुपारी ४ पर्यंत लोकल सेवा रद्द असेल. सकाळी ११.०६ ते दुपारी ४.०१ पर्यंत पनवेल/बेलापूरहून सीएसएमटी दिशेकडे जाणारी लोकल सेवा रद्द असेल. सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ पर्यंत सीएसएमटीहून बेलापूर/पनवेलसाठी सुटणारी सर्व लोकल सेवा रद्द असेल.
सकाळी १०.१२ ते दुपारी ३.५३ पर्यंत पनवेल/बेलापूर येथून ठाण्यासाठी सुटणाºया लोकल आणि सकाळी ११.१४ ते दुपारी ३.२० पर्यंत ठाणे येथून पनवेलसाठी सुटणाºया लोकल रद्द करण्यात येतील. सकाळी ११.०२ ते दुपारी ३.३२ पर्यंत नेरूळ/बेलापूर येथून खारकोपरसाठी सुटणाºया लोकल आणि सकाळी ११.३० ते दुपारी ४.१६ पर्यंत खारकोपरहून नेरूळ/बेलापूरसाठी सुटणाºया लोकल रद्द असतील. रविवारी ठाणे-वाशी/नेरूळ मार्गावरील सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. ब्लॉकवेळी सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल चालविण्यात येतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात आला नाही. मात्र शनिवारी-रविवारी रात्री माहिम-वांद्रे दरम्यान तांत्रिक कामासाठी मध्यरात्री १२ ते पहाटे ५.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, ब्लॉकदरम्यान माहिम आणि वांद्रे दरम्यानच्या मार्गावरील दोन्ही दिशेकडे जाणाºया धिम्या आणि जलद मार्गावरील लोकल फेºया रद्द करण्यात येणार आहेत.