सिग्नल दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 06:28 AM2020-03-07T06:28:03+5:302020-03-07T06:28:11+5:30

वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान शनिवार, ७ मार्च व ८ मार्च रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा यांची देखभाल आणि दुरुस्ती ब्लॉकवेळी करण्यात येईल.

Overnight block on the Western Railway for signal repair | सिग्नल दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक

सिग्नल दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक

googlenewsNext

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान शनिवार, ७ मार्च व ८ मार्च रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा यांची देखभाल आणि दुरुस्ती ब्लॉकवेळी करण्यात येईल.
शनिवारी-रविवारी रात्री १२ ते रात्री २.३० पर्यंत वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान चर्चगेट दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक असेल. तर, रात्री १.३० ते पहाटे ४ पर्यंत वसई रोड दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे एक्स्प्रेस १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.
आज २२ लोकल फेऱ्या रद्द; १७ लोकल फेºयाच्या मार्गात बदल
मध्य रेल्वे मार्गावरील विद्याविहार स्थानकावरील जुना पादचारी पुलाचे तोडकाम करण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी-रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेतला जाईल. परिणामी २२ लोकल फेºया रद्द आणि १७ लोकल फेऱ्यांच्या मार्गात बदल आहेत.
शनिवारी-रविवारी रात्री ११.१५ ते रात्री ३.१५ पर्यंत दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर, सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर आणि पाचव्या मार्गावरील लोकल फेºया बदल करण्यात आला आहे.
>मध्य, पश्चिम, हार्बरवर उद्या मेगाब्लॉक नाही
मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी जागतिक महिला दिनी कोणताही मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही. मात्र ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे-वाशी/नेरूळ/पनवेल दोन्ही दिशेकडील मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल.
ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी/नेरूळ/पनवेल दोन्ही दिशेकडील मार्गावर रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ४.२९ पर्यंत ब्लॉक असेल. परिणामी, ठाण्याहून वाशी/नेरूळ/पनवेल दिशेकडे जाणाºया लोकल रद्द करण्यात येतील. तर, सकाळी १०.४५ ते दुपारी ४.०९ पर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलहून ठाणे दिशेकडे जाणाºया लोकल रद्द करण्यात येतील.

Web Title: Overnight block on the Western Railway for signal repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.