अंधेरी सिलिंडर स्फोटप्रकरणी गोडावून मालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:06 AM2021-02-12T04:06:02+5:302021-02-12T04:06:02+5:30
तीन दिवसांची पोलीस कोठडी; वर्सोवा पोलिसांकडून तपास सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अंधेरी पश्चिम येथील यारी रोडच्या निवासी ...
तीन दिवसांची पोलीस कोठडी; वर्सोवा पोलिसांकडून तपास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरी पश्चिम येथील यारी रोडच्या निवासी भागात बुधवारी झालेल्या एचपी सिलिंडरच्या स्फोटप्रकरणी गोदाम मालकाला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. वर्सोवा पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यारी रोडवरील या सिलिंडर स्फोटाच्या घटनेत चारजण जखमी झाले. गोदाम मालक होटी वाडीलाल याला याप्रकरणी अटक करण्यात आली असून, त्याला गुरुवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार यांनी सांगितले. निवासी भागात ज्वलनशील वस्तूंचा साठा केल्याने इतरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच गेली ७ ते ८ वर्षे अनधिकृतपणे हे काम सुरू असल्याची माहिती आहे. त्यानुसार होटी याची तीन दिवस कसून चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
...................