झाड पडून अपघात झाल्यास जागा मालक जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 01:06 AM2019-04-19T01:06:15+5:302019-04-19T01:06:32+5:30

पावसाळ्यात धोकादायक झाडे पडून त्याखाली निष्पाप पादचारी गतप्राण होत आहेत.

 The owner of the house responsible for the fall of the tree | झाड पडून अपघात झाल्यास जागा मालक जबाबदार

झाड पडून अपघात झाल्यास जागा मालक जबाबदार

Next

मुंबई : पावसाळ्यात धोकादायक झाडे पडून त्याखाली निष्पाप पादचारी गतप्राण होत आहेत. अशा अनेक घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडल्या आहेत. मात्र अद्यापही या दुर्घटनांची जबाबदारी स्वीकारण्यास महापालिका तयार नाही. त्याऐवजी तुम्हीच पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी करण्याची ताकीद मुंबईकरांना दिली आहे. झाड पडून एखादी दुर्घटना घडल्यास त्याला संबंधित जबाबदार असेल, असा इशारा सोसायटी, शासकीय - निमशासकीय संस्था, खाजगी जागा मालक देण्यात आला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात कोसळणाऱ्या झाडांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांच्यामार्फत उद्यान खात्याची विशेष बैठक पार पडली. यामध्ये झाडांची छाटणी किंवा धोकादायक झाड कापण्यासाठी नियमांनुसार ठरलेले शुल्क विभाग कार्यालयाकडे जमा करावे. सात दिवसांनंतर झाडांच्या छाटणी केल्यानंतर तोडलेल्या फांद्या व कचºयाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधितांचीच किंवा पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराची असेल, असा इशारा पालिकेने या वेळी दिला.
२०१८ मधील वृक्ष गणनेनुसार मुंबईत एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खासगी आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त एक लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित एक लाख एक हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत.
सार्वजनिक ठिकाणी असणाºया झाडांची निगा पालिकेद्वारे घेतली जाते. तर सोसायटी, शासकीय-निमशासकीय संस्था, खाजगी जागा असणाºया झाडांची जबाबदारी संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
>झाडे पडण्याच्या घटना
१ जुलै २०१७ - ४५ वर्षीय रिक्षा ड्रायव्हर राजाराम यादव यांच्या बोरीवली येथे रिक्षावर झाड कोसळून मृत्यू झाला.
२२ जुलै २०१७ - दूरदर्शन अँकर असलेल्या कांचन नाथ यांचा चेंबूरमध्ये नारळाचे झाड अंगावर पडून मृत्यू झाला
७ डिसेंबर २०१७ - ४५ वर्षीय शारदा घोडेस्वार यांचा चेंबूरमध्ये गुलमोहराचे झाड अंगावर पडून मृत्यू झाला
एप्रिल २०१८ - दादरमध्ये झाड अंगावर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला

Web Title:  The owner of the house responsible for the fall of the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.