वास्तुदोषाचे कारण देत म्हाडा विजेत्याने ५.८ कोटींचे घर केले परत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 05:55 AM2019-03-26T05:55:28+5:302019-03-26T05:55:48+5:30

म्हाडाच्या लॉटरीत दोन घरे लागलेल्या विनोद शिर्के यांनी यातील ५.८ कोटींचे घर वास्तुदोषाचे कारण पुढे करीत म्हाडाला परत केले आहे. शिर्के यांना म्हाडाच्या लॉटरीमध्ये वरळी येथे एकाच इमारतीमध्ये दोन घरे लागली होती.

The owner of the MHADA has given a house of Rs 5.8 crores due to architectural reasons | वास्तुदोषाचे कारण देत म्हाडा विजेत्याने ५.८ कोटींचे घर केले परत

वास्तुदोषाचे कारण देत म्हाडा विजेत्याने ५.८ कोटींचे घर केले परत

googlenewsNext

मुंबई : म्हाडाच्या लॉटरीत दोन घरे लागलेल्या विनोद शिर्के यांनी यातील ५.८ कोटींचे घर वास्तुदोषाचे कारण पुढे करीत म्हाडाला परत केले आहे. शिर्के यांना म्हाडाच्या लॉटरीमध्ये वरळी येथे एकाच इमारतीमध्ये दोन घरे लागली होती. दोन्ही घरांची किंमत अनुक्रमे ५, ५.८ कोटी रुपये होती. यापैकी ५.८ कोटी रुपयांचे घर शिर्के यांनी म्हाडाला परत केले असून, सल्लागाराशी चर्चा केल्यानंतर वास्तुदोषामुळे हे घर परत करीत असल्याचे शिर्के यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शिर्के यांनी दोन घरांपैकी एक घर म्हाडाला परत केल्याने आता प्रतीक्षा यादीवरील दुसऱ्या क्रमांकावरील विजेता कोण आहे? हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, म्हाडाकडून चेंबूर येथील शेल कॉलनीमधील २१७ घरांची लॉटरी एप्रिल महिन्यात काढण्यात येणार आहे. या लॉटरीसाठी सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत २३ हजार ५०२ जणांनी अर्ज केल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले.

Web Title: The owner of the MHADA has given a house of Rs 5.8 crores due to architectural reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.