लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेराेना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी आणि बाधितांना बरे करण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाय करत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने गोरेगावच्या नेस्को जम्बो कोविड सेंटरला ६
ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देण्यात आले.
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा थेट परिणाम रुग्णाच्या ऑक्सिजन पातळीवर होतो. ही पातळी स्थिर ठेवण्यासाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची गरज अनेक रुग्णालयांत भासत आहे. अशा कठीणप्रसंगी ५ लिटर क्षमतेचे ६ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर गुरुवारी नेस्को जम्बो कोविड सेंटरसाठी पी. दक्षिण विभाग आरोग्य अधिकारी डॉ. नितीश ठाकूर यांच्याकडे शिवसेना नेते व उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर, आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू व युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले.
--------------------------------------------------