Join us

ऑक्सिजनचा वापर १० ते १५ टक्क्यांवर आला; कोरोना नियंत्रणात आल्याने मागणी घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2020 5:58 AM

CoronaViris News In Mumbai : राज्यासह मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मुंबईतही हे प्रमाण ८८ टक्क्यांवर आहे. त्यामुळे राज्यातही ऑक्सिजनच्या मागणीत ३४ टक्क्यांनी घट झाली आहे.

- स्नेहा मोरे

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाची स्थिती नियंत्रणात येते आहे. मागील काही दिवसांत रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे वैद्यकीय कारणासाठी लागणऱ्या आॅक्सिजनचे प्रमाणही ४० टक्क्यांहून १० ते १५ वर आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. शहर उपनगरात आॅक्सिजनची सोय असलेल्या एकूण ९ हजार १३४ खाटा आहेत, त्यापैकी ३ हजार ८०७ खाटावर रुग्ण दाखल असून सध्या ५ हजार ३२७ खाटा रिकाम्या आहेत.राज्यासह मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मुंबईतही हे प्रमाण ८८ टक्क्यांवर आहे. त्यामुळे राज्यातही ऑक्सिजनच्या मागणीत ३४ टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबईत कोरोना संसर्ग वाढीस असताना जवळपास ४० टक्के ऑक्सिजन लागत होते. मात्र आता हे प्रमाण १० ते १५ टक्क्यांवर आले आहे. पालिका आणि कोविड केंद्रांसह सगळीकडे ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी १३ हजार लीटर टर्बो असलेले सिलिंडर लावण्यात आले आहे, याचे प्रमाण ४० टक्क्यांच्या खाली कधीच येऊ दिले नाही, इतके प्रमाण आल्यावर प्रशास रिफिलिंग कऱत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

कोरोना संकटात मागणी होती अधिकमुंबईत कोरोना संसर्ग वाढीस असताना जवळपास ४० टक्के ऑक्सिजन लागत होते. मात्र आता हे प्रमाण १० ते १५ टक्क्यांवर आले आहे.

यामुळे काेराेनावर नियंत्रण मिळवणे शक्यप्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर, वैद्यकीय उपचारविषयक आवश्यक कार्यवाही, शीघ्रकृती कार्यक्रमाची अभियान स्वरूपात अंमलबजावणी, फिरते दवाखाने,  प्राणवायू पातळी तपासणे, शारीरिक तापमान तपासणे, नागरिकांना असलेल्या सहव्याधींची स्वतंत्र नोंद करून उपाययाेजना इत्यादी.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई