तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेची ऑक्सिजन व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 07:21 AM2021-05-09T07:21:41+5:302021-05-09T07:22:56+5:30

राज्य सरकारने मुंबईला दररोज २३५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा वाटा निश्चित केला आहे. प्रत्यक्षात मुंबईला दररोज सरासरी २७५ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे.

Oxygen Management of Mumbai Municipal corporation | तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेची ऑक्सिजन व्यवस्था

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेची ऑक्सिजन व्यवस्था

Next

मुंबई: कोरोनाची तिसरी लाट जुलै ते सप्टेंबर या कालावधीत येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, दुसऱ्या लाटेच्या अनुभवावरून नवीन येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिकेची तयारी सुरू आहे. त्यानुसार भविष्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा यासाठी पालिकेने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. याअंतर्गत दोन हजार लिटर प्रतिमिनिट आणि तीन हजार लिटर प्रतिमिनीट ऑक्सिजन उत्पादन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. तर रुग्णालयांना १० लिटर प्रतिमिनिट क्षमतेचे सुमारे १,२०० प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा विचार आहे. (Oxygen Management of Mumbai Municipal corporation)

राज्य सरकारने मुंबईला दररोज २३५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा वाटा निश्चित केला आहे. प्रत्यक्षात मुंबईला दररोज सरासरी २७५ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यामुळे ही गरज भागविण्यासाठी ऑक्सिजनचे जतन आणि काटकसरीने वापर करण्याचे महापालिकेने सर्व रुग्णालयांना निर्देश दिले आहेत. तसेच भविष्यात पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार दोन हजार लिटर प्रतिमिनिट, तीन हजार लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजन उत्पादन प्लांट उभारण्यात येणार आहेत. जून २०२१ मध्ये ही सयंत्रे कार्यान्वित होणार आहेत. त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्वातून मिळालेले प्रेशर स्विंग ऑक्सिजन जनरेटर सयंत्र उभारण्यात येत आहेत. पालिकेच्या विविध रुग्णालयांना १० लिटर प्रतिमिनिट क्षमतेचे सुमारे १,२०० प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

- अन्न-औषध प्रशासन आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी मुंबईतील रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवून आहेत. तर अन्य राज्यांतून ऑक्सिजन मिळविण्याचेही प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
- पालिकाकडून अन्न व औषध प्रशासनाकडे सहा समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक विभाग कार्यालयांमध्ये दोन स्वतंत्र अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
- एक उपायुक्त, एक प्रमुख अभियंता, दोन कार्यकारी अभियंता आणि एक उपअधिष्ठाता यांचा समावेश असलेली मध्यवर्ती पथकेही सज्ज करण्यात आली आहेत. विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्त, मध्यवर्ती पथके आदींच्या समन्वयाने ऑक्सिजन पुरवठ्याबाबत तोडगा काढण्यात येत असल्याचे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
 

Web Title: Oxygen Management of Mumbai Municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.