राज्य निवडणूक आयुक्तपदी यू. पी. एस. मदान यांची नियुक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 03:11 PM2019-09-05T15:11:43+5:302019-09-05T15:18:31+5:30

राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला असून  राज्यपाल यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

P. S. Madan select of the State Election Commissioner | राज्य निवडणूक आयुक्तपदी यू. पी. एस. मदान यांची नियुक्ती 

राज्य निवडणूक आयुक्तपदी यू. पी. एस. मदान यांची नियुक्ती 

googlenewsNext

मुंबई: राज्याचे सहावे राज्य निवडणूकआयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला असून राज्यपाल यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. तसेच मदान हे 1983 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते.

राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून सेवा बजावली. त्याचबरोबर त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे.

मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. आयोगाचे सचिव श किरण कुरुंदकर यांनी  मदान यांचे स्वागत केले. आयोगातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  सहारिया यांचा राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ बुधवारी (ता. 4) पूर्ण झाला.

Web Title: P. S. Madan select of the State Election Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.