Join us

पी दक्षिण प्रभागाचा कायापालट करणार, प्रभाग समिती अध्यक्ष संदीप पटेल यांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 7:07 PM

पी दक्षिण प्रभागाचा कायापालट करण्याचा निर्धार नवंनिर्वाचित अध्यक्ष संदीप पटेल यांनी व्यक्त केला आहे.पी दक्षिण प्रभाग समितीचा कारभार जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

- मनोहर कुंभेजकर

मुंबई  -  पी दक्षिण प्रभागाचा कायापालट करण्याचा निर्धार नवंनिर्वाचित अध्यक्ष संदीप पटेल यांनी व्यक्त केला आहे.पी दक्षिण प्रभाग समितीचा कारभार जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रभाग समिती सहका-यांच्या मदतीने व पालिका प्रशासनाच्या सहकार्याने  आपण या प्रभागा च्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संदीप दिलीप पटेल यांची  २०१८-२०१९ साठी पी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून कोणते संकल्प राबवणार याबाबत त्यांनी लोकमतशी बोलतांना आपले मनोगत व्यक्त केले.

 गोरेगावमध्ये असलेले सिद्धार्थ हॉस्पिटलचे सक्षमीकरण करणे, टोपीवाला प्रसूतिगृहाची सुरवात करणे, अत्याधुनिक नाट्यगृह उभारणे, मृणालताई उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे, निश्चित कालावधीत वीर सावरकर पुलाचे काम पूर्ण करणे, मुलुंड-लिंक रोड वरील वाहतूक कोंडी दूर करणे, गोरेगाव मधील महापालिका शाळांमध्ये इस्कॉनतर्फे पुरवण्यात येणारी खिचडी विद्यार्थ्यांना देणे, राम मंदिर येथील एस.आर.ए वसाहत येथे आरोग्य केंद्र सुरु करणे, महापालिकेच्या माध्यमातुन महिलांकरिता वसतीगृह सुरु करणे, गोरेगाव मध्ये मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करणे ही नागरी कामे करण्याकडे आपला मनोदय असल्याचे सांगितले. तसेच स्वच्छ व हरीत गोरेगावचे स्वप्न साकारणाच्या प्रयत राहील असेही पटेल म्हणाले.  त्यांनी आपल्या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे- पाटील, मुंबई अध्यक्ष व आमदार अँड.आशिष शेलार, आमदार व जिल्हाध्यक्ष अमित साटम, जयप्रकाश ठाकूर, माजी उपमहापौर दिलीप पटेल, मुंबई भाजप सचिव समीर देसाई, पालिका गटनेते मनोज कोटक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष रामदास आठवले आदी मान्यवरांचे आभार मानून व्यक्त केले. तसेच भारतीय जनता पक्षातील नेते, कार्यकर्ते तसेच भाजपाच्या नेत्यांनी टाकलेली जबाबदारी पूर्णत्वास नेईन असा विश्वास पटेल यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका