लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई- पश्चिम दुर्तगती महामार्गावर साकारलेली आकर्षक विद्युत रोषणाई,स्वामी विवेकानंद रस्त्यावरील दुभाजकां मध्ये सुंदर लावलेली फुलझाड, पदपथांची रंगरंगोटी आणि विविध उपक्रम राबवून पालिकेच्या पी दक्षिण विभागा तर्फे केले जात असलेले सुशोभिकरण यामुळे गोरेगावचा परिसर तर उजळून निघाला आहे.त्यामुळे पी दक्षिण विभाग चकाचक होत असल्याचे गौरवोद्गार गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी काढले.
मुंबई सुशोभीकरण प्रकल्प राबविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत मनपाला आवश्यक निधी देऊन, मुंबईच रूप बदलायचे मुमनपा आयुक्ताना आदेश दिले. सदर कामांची गती आता वाढत असून, मुंबई आता चकाचक व सुशोभित दिसू लागली आहे.
पी दक्षिण विभागात परिमंडळ ४ चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शन खाली येथील सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी आपला वॉर्ड सुशोभित करून जोमाने चकाचक करण्यासाठी कंबर कसली आहे. गोरेगाव पश्चिम स्वामी विवेकानंद रस्त्यावरील दुभाजकां मध्ये सुंदर फुलझाडं लावून रस्त्याच रूप बदलून टाकले आहे. तर हायवे वरील मृणाल गोरे पूल तर वेगवेगळे रंगाद्वारे आकर्षक दिसत असून, रात्री तर त्यावरील रोषणाई मुळे, तर मुंबईकरांना आणि मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना विदेशात आल्याचा भास होतो, तसेच अनेक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने साकारलेल्या सुशोभिकरणात अजून भर पडली आहे.गोरेगावचे पालटले रूप बघून गोरेगावकर तर आश्चर्यचकित झाले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"