खासगी रुग्णालयाच्या मेडिकल डायरेक्टरच्या पीएला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:03 AM2020-12-28T04:03:52+5:302020-12-28T04:03:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पेटीएम, बँक खाते केवायसी करण्याच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना डोकेवर काढत असताना, आता सिम कार्ड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पेटीएम, बँक खाते केवायसी करण्याच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना डोकेवर काढत असताना, आता सिम कार्ड केवायसी करण्याच्या नावाखाली फसवणुकीला सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या एका नामांकित खासगी रुग्णालयाच्या पीएला एअरटेल मोबाइल क्रमांकाच्या केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली गंडा घातला आहे. या प्रकरणी रविवारी व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चिराबाजार परिसरात ३९ वर्षीय तक्रारदार महिला कुटुंबीयासोबत राहतात. २३ डिसेंबर रोजी कामावर असताना, एअरटेल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून ठगाने त्यांना केवायसी अपडेट करण्यास सांगितले. तेव्हा ठगाने १० रुपयांचे रिचार्ज करण्यास सांगितले. त्याने दिलेल्या लिंकवरून रिचार्ज करताच, त्यांच्या खात्यातून ७ वेगवेगळ्या व्यवहारातून १ लाख २ हजार रुपये काढले. याबाबतचे संदेश मोबाइलवर येताच, त्यांना धक्का बसला. त्यांनी संबंधित क्रमांकावर पुन्हा संपर्क साधताच, तो क्रमांक बंद होता. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांत धाव घेतली.