पालघरमधील शाळा बंदचा निर्णय स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 04:58 AM2017-07-29T04:58:01+5:302017-07-29T04:58:09+5:30
पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली.
मुंबई : पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली.
पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या १२९ शाळा बंद केल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांनी कोंबड्या-बकºयांसह गुरुवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता. याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
शिक्षण हक्क कायद्यानुसार किमान ३० विद्यार्थी संख्या नसलेल्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांची सोय नजीकच्या शाळेत करण्यात येत आहे. मात्र, हा निर्णय डोंगराळ, आदिवासी व दुर्गम भागातील शाळांना लागू नाही. आमचे सर्वेक्षण चालू आहे. ग्रामीण भागातल्या शाळांत प्रवासाची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना पाठवता येईल का याचाही अभ्यास सुरू आहे. अहवाल आल्यावरच निर्णय होईल. पालघरमधील ज्या शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे, तो स्थगित करण्यात येत असल्याचे तावडे म्हणाले.