Join us

Padmaavat Movie Review: 'पद्मावत' पाहणार नसाल तर नक्कीच होईल पश्चाताप 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 10:21 AM

दिग्दर्शक व निर्माता संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित पद्मावत सिनेमाची मोहिनी

ठळक मुद्देपद्मावत सिनेमाचे रेटिंग - 4.5 स्टारदिग्दर्शक - संजय लीला भन्साळी कलाकार - दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, शाहिद कपूर, रजा मुराद आणि अदिती राव हैदरी

मुंबई -  दिग्दर्शक व निर्माता संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित पद्मावत सिनेमा प्रेक्षकांना घायाळ करणार आहे. देशभरात सध्या 'पद्मावत, पद्मावत आणि पद्मावत'चीच चर्चा आहे.  भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमा सिनेरसिकांना मोहिनी घालणार एवढं नक्की आहे. या सिनेमातील प्रत्येक पात्र थेट तुमच्यापर्यंत कसे पोहोचतील, याची पुरेपुरे काळजी भन्साळी यांनी घेतली आहे आणि यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाहीत, हे त्यांच्या पूर्वीच्या सिनेमातून पाहायला मिळालं आहे. 

अलाउद्दीन खिलजीपासून ते राजा रतन सिंह आणि राणी पद्मावती या सर्व भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. सिनेमा पाहिल्यानंतर या सर्व पात्रांचा विचार सिनेमागृहातून बाहेर पडल्यानंतरही तुमच्या डोक्यात सुरूच राहणार, एवढं मात्र नक्की. 'राम-लीला', 'बाजीराव मस्तानी' सिनेमानंतर संजय लीला भन्साळी यांचे 'पद्मावत'च्या निमित्तानं पुन्हा एकदा दिग्दर्शनाचं उत्तम कौशल्य पाहायला मिळणार आहे.  

पाहा व्हिडीओ - कोण होती पद्मावती ? जाणून घ्या का सुरु आहे वाद ? 

काय आहे कथा?'पद्मावत' सिनेमा मलिक मुहम्मद जायसी यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित असल्याचे सिनेमाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले आहे. राजपूत समुदायाच्या भावना दुखावल्या जातील, अशी कोणतीही गोष्ट या सिनेमामध्ये चित्रित करण्यात आलेली नाही. राजा रतन सिंह यांच्या आयुष्यावर आधारीत सिनेमाची कहाणी आहे. राजा रतन सिंह यांचे पद्मावतीवर प्रेम जडते. यानंतर पद्मावती चित्तोडची राणी बनते. मात्र एक जण अलाउद्दीन खिलजीला राणी पद्मावतीविरोधात भडकवतो आणि चितौडचा बदला घेण्यास भाग पाडतो. 

दरम्यान, सिनेमामध्ये अलाउद्दीन आणि राणी पद्मावती या व्यक्तीरेखांना कुठेही एका फ्रेममध्ये दाखवण्यात आलेले नाही. सिनेमाची कहाणी सुरुवातीपासून ते सिनेमाचा शेवट होईपर्यंत प्रेक्षकांना आपल्यासोबत बांधून ठेवते. संजय लीला भन्साळी यांनी अत्यंत उत्कृष्ट आणि कमाल पद्धतीनं सिनेमाची कहाणी मोठ्या पडद्यावर मांडली आहे. रणवीर सिंह हा सिनेमामध्ये अलाउद्दीन खिलजी या नकारात्मक भूमिकेत आहे, मात्र तरीही संपूर्ण सिनेमात त्यानंच भाव खाल्ला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमातील संगीत आणि गाणीदेखील तितकीच तगडी असतात. बाजीराव मस्तानी सिनेमातील गाण्यांचा फीव्हर अद्यापपर्यंत सिनेरसिकांवर कायम आहे. पद्मावतमध्ये एकूण सहा गाणी असून ती सर्वच्या सर्व तितकीच दमदार आहेत.

दमदार अभिनय सिनेमामध्ये सर्वांनीच दमदार अभिनय केला आहे. रणवीर सिंहनं अलाउद्दीन खिलजीची जिवंत व्यक्तीरेखा मोठ्या पडद्यावर साकारली आहे. रणवीरची सिनेमातील स्टाईल, भूमिकेतील क्रूरपणा, त्याची एनर्जी हे पाहून तोंडातून आपसुकच वाह.. हा शब्द आल्याशिवाय राहणार नाही. रणवीरनं एकाच व्यक्तीरेखेचे निरनिराळे पैलू अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं मांडले आहेत. जगातील प्रत्येक गोष्टीवर कब्जा करणाची इच्छा बाळगणारा अलाउद्दीन खिलजी राणी पद्मावतीची एक झलक पाहण्यासाठी शेवटपर्यंत तळमळत राहतो. शाहिदनं राजा रतन सिंह यांची भूमिका अगदी चोख वटवली आहे. शाहिदनं आपल्या अभिनयानं, चेह-यावरील हावभावांनी राजा रतन सिंह यांच्या व्यक्तीरेखेत अक्षरशः जीव ओतल्याचे दिसत आहे.

सिनेमातील महत्त्वपूर्ण तसंच आकर्षक अशी भूमिका आहे राणी पद्मावतीची. दीपिका पादुकोण पद्मावतीच्या भूमिकेत अप्रतिम दिसत आहे. सिंहल द्वीपची शिकार करणारी पद्मावती असो किंवा चित्तौडची राणी सा, दीपिका प्रत्येक दृश्यांमध्ये कमाल दिसलीय. राजपूतांच्या पारंपरिक वेशातील दीपिका तर अतिशय मनमोहक दिसली आहे. दीपिकाचा जौहर जाण्याचा सीन पाहताना अंगावर काटा उभा राहतो. एकूण दीपिकाच्या अभिनयाला तोडच नाहीय.

ज्या पद्धतीनं सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच राजपूत संघटनेकडून विरोध दर्शवण्यात आला होता, तशी एकही आक्षेपार्ह गोष्टी सिनेमामध्ये चित्रित करण्यात आलेली नाही. या उलट संजय लीला भन्साळी यांनी अतिशय शानदार पद्धतीनं राजपूतानेशाही मोठ्या पडद्यावर मांडली आहे.  या सिनेमाचं बजेट 180 कोटी रुपये एवढे आहे. भन्साळींचा 'पद्मावत'देखील सिनेचाहत्यांना मोहिनी घालणार यात काही वादच नाही.  त्यामुळे 'पद्मावत' पाहिला नाही तर पश्चाताप होईल एवढं मात्र खरं, त्यामुळे सिनेमा नक्कीच पाहा 

टॅग्स :पद्मावतदीपिका पादुकोणसंजय लीला भन्साळीशाहिद कपूररणवीर सिंग