मुंबई - हेलिकॉप्टर अपघातात वीरमरण आलेले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह महाराष्ट्राच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांना मंगळवारी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. तर देशात कोरोनाची लस तयार करणाऱ्या पुण्यातील उद्योजक सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. वैद्यकीय क्षेत्रात देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला. त्यानंतर, पुनावाला यांचे मित्र आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी, एकूण 128 नागरिकांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सायरस पुनावाला यांच्यासह पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, आयटी क्षेत्रात देशाचे नाव कोरणारे सुंदर पिचई, सत्या नडेला, गुलाम नबी आझाद व महाराष्ट्राचे नटराजन चंद्रशेखर यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यात, महाराष्ट्रातील 10 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव होणार आहे.
त्यातच त्यांच्या मित्राला भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांना आनंद झाला आहे. म्हणूनच, आजारी असतानाही त्यांनी ट्विट करुन मित्राचे जाहीरपणे अभिनंदन केले आहे.