दत्त जयंतीनिमित्त पाद्यपूजन सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 02:35 AM2019-12-11T02:35:08+5:302019-12-11T02:35:26+5:30
काशी धर्मपीठाधिश्वर जगतगुरू शंकराचार्य स्वामी नारायणानंद तीर्थजी महाराज यांच्या हस्ते मंगळवारी पाद्यपूजन करण्यात आले.
मुंबई : नायगाव-भोईवाडा येथील श्री दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री दत्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
काशी धर्मपीठाधिश्वर जगतगुरू शंकराचार्य स्वामी नारायणानंद तीर्थजी महाराज यांच्या हस्ते मंगळवारी पाद्यपूजन करण्यात आले. या वेळी स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर आदी उपस्थित होते. मंगळवारी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये अभिषेक
पूजन, श्री दत्तयाग प्रारंभ, शांती सूक्त पठण, नवग्रह स्थापना, नवग्रह हवन होणार असून बुधवार, ११ डिसेंबर रोजी दत्त जयंती दिवशी सकाळी ६ वाजता अभिषेक पूजन, सहस्र तुलसी अर्चन तसेच सायंकाळी ६.३0 वाजता दत्त जन्मोत्सव व दीपोत्सव होणार असून सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आल्याचे यज्ञाचार्य मोहन पुराणिक तसेच निमंत्रक प्रसाद शिंगणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.