पान १....सलमानच्या अडचणी वाढल्या

By Admin | Published: December 3, 2014 10:35 PM2014-12-03T22:35:50+5:302014-12-03T22:35:50+5:30

सलमानच्या अडचणी वाढल्या

Page 1 .... Salman's problems have increased | पान १....सलमानच्या अडचणी वाढल्या

पान १....सलमानच्या अडचणी वाढल्या

googlenewsNext
मानच्या अडचणी वाढल्या
रक्तात सापडलेले प्रमाणापेक्षा अधिक मद्य
उरले शेवटचे सहा साक्षीदार
मुंबई :
हिट अण्ड रन घटनेनंतर अभिनेता सलमान खानच्या रक्तात प्रमाणापेक्षा अधिक मद्य असल्याची साक्ष बुधवारी रासायनिक विश्लेषक भालशंकर यांनी सत्र न्यायालयात दिली़ त्यामुळे आता सलमानने घटनेच्या दिवशी मद्यपान केले होते, याला दुजोरा मिळाला असून त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत़ कारण हा अपघात झाला तेव्हा सलमानने मद्यपान केले होते, असा सरकारी पक्षाचा दावा असून या साक्षीने त्यालाही पुष्टी मिळाली आहे़
मानवी शरीरात सर्वसामान्यपणे ३० एमजी मद्य असते व औषध घेतल्यानंतर याचे प्रमाण ४० एमजी होते़ तर मुंबई मद्य प्रतिबंधक कायद्यानुसार याची मर्यादा ५० एमजी आहे़ मात्र सलमानची रक्तचाचणी केली असता त्यात याचे प्रमाण ६२ एमजी होते, असे भालशंकर यांनी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना न्यायालयाला सांगितले़
मात्र, यावर सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी आक्षेप घेतला़ ते म्हणाले, वांद्रे पोलिसांनी जे़ जे़ रूग्णालयाला एकच रक्ताचा नमुना पाठवला असल्याचे म्हटले आहे़ पण जे़जे़ रूग्णालयाने फॉरेंसिक लॅबला रक्ताचे दोन नमूने पाठवले असल्याचे नमूद केले आहे़
ही तफावत स्पष्ट होण्यासाठी आधी जे़ जे़ रूग्णालयातील डॉक्टरची साक्ष होणे आवश्यक आहे़ त्यामुळे डॉक्टरांची साक्ष झाल्यानंतर भालचंद्र यांची उलटतपासणी आम्ही घेऊ, असे ॲड़ शिवदे यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले़ ते न्यायालयाने मान्य केले़
त्यानंतर मोटार निरीक्षक केसरकर यांची साक्ष नोंदवण्यात आली़ केसरकर यांनी अपघात झालेल्या लॅण्ड क्रुझर गाडीचा तपशील न्यायालयाला दिला़ यावरील पुढील सुनावणी १५ डिसेंबरला होणार आहे़
सलमानने १२ वर्षांपूर्वी वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत चौघांना चिरडले़ यात एकाचा बळी गेला़ याप्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू असून यात दोषी आढळल्यास सलमानला दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते़ (प्रतिनिधी)
...............................
(चौकट)
निकाल नव्या वर्षातच !
सलमानचा खटला अंतिम टप्प्यात आला असून यातील केवळ सहा साक्षीदारांची साक्ष शिल्लक असल्याचे ॲड़ घरत यांनी स्पष्ट केले आहे़ यात जे़ जे़ रूग्णालयाचे डॉक्टर, दोन पोलीस अधिकारी व इतर साक्षीदारांचा समावेश आहे़ त्यामुळे आता नवीन वर्षांतच सलमानचा निकाल जाहीर होईल़
................................
(चौकट)
बहिणींसह सलमान न्यायालयात....
बुधवारीच्या सुनावणीला सलमान त्याच्या दोन बहिणींसोबत न्यायालयात हजर होता़ सलमान हा भालशंकर यांची साक्ष निरागस चेहर्‍याने ऐकत होता़ विशेष म्हणजे १५ डिसेंबला सुनावणीला हजर न राहण्याची मुभा न्यायालयाने सलमानला दिली आहे़ मात्र त्यापुढील सुनावणीला त्याला हजर रहावे लागेल़

Web Title: Page 1 .... Salman's problems have increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.