पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये हिंसाचाराला प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:07 AM2021-07-07T04:07:03+5:302021-07-07T04:07:03+5:30

मुंबई : काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये विकासकामांमधील वाढ, राजकीय चर्चा, पर्यटनामधील सकारात्मकता यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्यातूनच नाराज ...

Pakistan promotes violence in Kashmir | पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये हिंसाचाराला प्रोत्साहन

पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये हिंसाचाराला प्रोत्साहन

Next

मुंबई : काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये विकासकामांमधील वाढ, राजकीय चर्चा, पर्यटनामधील सकारात्मकता यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्यातूनच नाराज झालेला पाकिस्तान काश्मीरमध्ये हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहे. ड्रोनच्या मदतीने आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने एके-४७ रायफली, स्फोटके, अंमलीपदार्थ आणि बनावट नोटा भारतात पाठविल्या आहेत. खलिस्तानी दहशतवाद्यांना ड्रोन्सद्वारे शस्त्रपुरवठाही केला जात असल्याचे मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने रविवारी झालेल्या ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते.

अलीकडेच झालेल्या ड्रोन हल्ल्याबाबत महाजन यांनी तपशीलवार माहिती दिली.

ते म्हणाले, काश्मीरमध्ये अजूनही दोनशे ते अडीचशे दहशतवादी आहेत. त्यांना संपवण्यासाठी लष्कराने ऑल क्लिअर हे ऑपरेशन सुरू केले आहे. यामुळे परदेशी दहशतवाद्यांच्या संख्येत घट झाली आहे. पाकव्याप्त काश्मीर, बलुचिस्तान, वझिरीस्तान या भागात राहाणारे नागरिक दहशतवादी बनण्यास तयार नाहीत.

लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रापुढे दिखावा करण्यासाठी स्थानबद्ध केले असले तरी त्याच्याकडून दहशतवादी कारवाया सुरूच आहेत.

२७ जूनला जम्मूतील हवाई दलाच्या तळावर पहाटे दोन कमी तीव्रतेचे स्फोट झाले. हा दहशतवादी हल्ला पाकिस्तानातून ड्रोनने करण्यात आला होता. देशात पहिलांदाच ड्रोनद्वारे हल्ला झाला व याची तपासाची सूत्रे एनआयएकडे देण्यात आली आहेत. जम्मू एअरफोर्स स्टेशनच्या टेक्निकल एरियाजवळ स्फोट झाल्यामुळे दोन हवाई दलाचे जवान किरकोळ जखमी झाले. पाच मिनिटांच्या फरकाने दोन स्फोट झाले. पहिला स्फोट कॅम्पस इमारतीच्या छतावर आणि दुसरा त्या खाली झाला. हा स्फोट विमानांना बरबाद करण्याकरिता होता. स्फोटके ड्रोनमधून खाली टाकण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर प्रश्न असा पडतो की, हे ड्रोन पाकिस्तानच्या बाजूने आले. त्यांना आपल्या रडारने पाहिले का नाही? आपल्याकडील रडार ही महत्त्वाच्या ठिकाणी लावलेली असतात, तीसुद्धा युद्धजन्य परिस्थितीत काम करत असतात. संपूर्ण साडेचार हजार पाकिस्तानी सीमेवरती किंवा ७ हजार ६०० किलोमीटर या समुद्री सीमेवर अशा प्रकारचे लक्ष ठेवणारी सिस्टिम आपल्याकडे नाही. कारण, ही सिस्टिम अतिशय महागडी असते. म्हणजेच पाकिस्तानने आपल्या विरुद्ध कमी पैसे लागणाऱ्या ड्रोन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने दहशतवाद सुरू केला आहे.

Web Title: Pakistan promotes violence in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.