मनोहर कुंभेजकर
मुंबई- एनआरसी, सीएएचा मुद्दा देशात कळीचा मुद्दा झाला असताना आता उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी संसदेत 377 नियम अन्वये पाकिस्तानने हिंदुस्थानला पाकव्याप्त जमीन द्यावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या या भूमिकेचे जोरदार स्वागत होत असल्याचे चित्र आहे. याबाबत लोकमतला अधिक माहिती देताना खासदार शेट्टी म्हणाले की,1947 साली हिंदुस्थान व पाकिस्तानचे लोकसंख्या व जातीच्या आधारे विभाजन झाले. पाकिस्तान मधील हिंदू, अल्पसंख्यांक, सिंधी, शिख, जैन, बौद्ध आदी विविध जातींचे नागरिक मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी भारतात आले. पाकिस्तानमधून आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आलेल्या नागरिकांच्या संख्येनुसार पाकव्याप्त हद्दीतील जमीन त्यांनी हिंदुस्थानला द्यावी अशी मागणी करून खासदार शेट्टी यांनी खळबळ माजवून दिली आहे.
पाकिस्तानमधून भारतात आलेल्या मुस्लिम धर्माच्या नागरिकांना आपल्या देशात सन्मानाने व नेहमीच चांगलीच वागणूक मिळते. मात्र आजही पाकिस्तानात राहात असलेल्या हिंदू जाती धर्माच्या नागरिकांना तिकडे चांगली वागणूक मिळत नाही.त्यांना मारझोड होते,महिलांवर अत्याचार होतात, त्यांचा छळ होतो. त्यामुळेे पाकिस्तानात राहत असलेले नागरिक मोठ्या प्रमाणत स्थलांतर करून आपल्या देशात वास्तव्यास आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आपल्या देशात पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांच्या लोकसंख्येच्या प्रमाणत पाकिस्तानने त्यांच्याकडील पाकव्याप्त जमीन आपल्या देशाला दिली पाहिजे. त्यामुळे पाकिस्तानातून येथे आलेल्या नागरिकांना जमीन आणि नागरिकत्व मिळवून देतांना त्यांना चांगल्या सुविधा देखील आपल्याला उपलब्ध करून देता येतील असा ठाम विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र बजेट 2020 Live: अर्थमंत्र्यांच्या 'त्या' घोषणेनंतर सगळ्या आमदारांनी वाजवले बाक
'जनाची नाही किमान मनाची तरी...', मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
महाराष्ट्र सीआयडी वेबसाईट हॅक!
एका मिनिटात ४ लाख कोटी स्वाहा; येस बँक, कोरोनामुळे शेअर बाजार गडगडला
China Coronavirus : 'सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची कोरोना तपासणी करा'