मुंबई : व्हिसाचा कालावधी संपूनही देशात वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी दाम्पत्याला पाकिस्तानमध्ये परत पाठवण्याचा आदेश आधी उच्च न्यायालय व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देऊनही त्यांना परत न पाठवल्याबद्दल उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला धारेवर धरले. आतापर्यंत त्यांना परत का परत पाठवण्यात आले नाही, याचे स्पष्टीकरण मागत स्पष्टीकरण न मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. परवानगीशिवाय लाल दिव्याची गाडी वापरल्याचा व दर्ग्यांमधून चिथावणीखोर भाषण देण्याचा आरोप असलेल्या वसीम-उर-रेहमानचा व्हिसा संपल्याने त्याला पाकिस्तानात पाठवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला होता. (प्रतिनिधी)
पाकिस्तानी दाम्पत्याला परत का पाठवले नाही? - हायकोर्ट
By admin | Published: February 23, 2017 4:32 AM