‘२६/११’ भगवा दहशतवाद ठरविण्याचा पाकचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 05:45 AM2020-02-19T05:45:01+5:302020-02-19T05:45:32+5:30

राकेश मारिया यांचा गौप्यस्फोट; देवेन भारती, अहमद जावेद यांच्यावर आत्मचरित्रातून टीका केल्याने उठले वादळ

Pakistan's Left to Declare '9/11' Saffron Terrorism | ‘२६/११’ भगवा दहशतवाद ठरविण्याचा पाकचा डाव

‘२६/११’ भगवा दहशतवाद ठरविण्याचा पाकचा डाव

googlenewsNext

मुंबई : मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला हा हिंदू संघटनांकडून करण्यात आला हे दाखविण्यासाठी पाकिस्तानने कट केला. त्यासाठी सर्व अतिरेक्यांकडे खोटी ओळखपत्रे देऊन त्याला भगवा रंग देण्याचा प्रयत्न होता. मात्र अजमल कसाब जिवंत सापडल्याने त्यांचा डाव फसला, असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या ‘लेट मी से इट नाऊ’ या आत्मचरित्रात केला आहे.

मारिया यांनी आपल्या पुस्तकात पोलीस दलातील राजकारण आणि राजकीय हस्तक्षेपाबाबतही भाष्य केले असून त्यांचे तत्कालीन सहकारी व एटीएसचे प्रमुख देवेन भारती आणि माजी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्यावर टीका केली आहे. मात्र दोघांनीही त्याचा इन्कार केला. शीना बोरा हत्याकांड प्रकरणी राकेश मारिया तपासात अतिरिक्त स्वारस्य दाखवित असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी केली. त्यांच्या अपमर्जीमुळे सेवाज्येष्ठता असूनही ‘होमगार्ड’मध्येच निवृत्त व्हावे लागले, असे म्हटले आहे.

‘२६/११’च्या हल्ल्याचा तपास राकेश मारिया यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता. हल्ल्याच्या अनुषंगाने त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने २६/११ हल्ला हा हिंदू दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न केला. १० हल्लेखोरांना हिंदू सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासोबत बनावट ओळखपत्रे पाठवली होती. कसाबकडेही एक ओळखपत्र होते, त्यावर समीर चौधरी असे नाव लिहिले होते. तो बंगळुरू व हैदराबादच्या दिलकुशनगरमधील एका महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचे नमूद केले होते. कसाबशी संबंधित माहिती गोपनीय ठेवणे मोठे आव्हान होते, त्याला जिवंत ठेवणे माझी प्राथमिकता होती. त्याचा फोटो किंवा अधिक माहिती जारी करायचीच नव्हती. मीडियाला त्याची माहिती मिळू नये, असा आमचा प्रयत्न होता. खटल्याच्या वेळीही पाकिस्तानचा मुखवटा फाटत होता, त्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीला कसाबला मारण्याची सुपारी मिळाली होती. कसाबला जिवंत ठेवणे माझी प्राथमिकता होती. एकमेव जिवंत पुरावा असल्याने त्याला मारण्यासाठी पाकिस्तान आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ प्रयत्न करीत होते, असा दावा मारिया यांनी केला आहे.

‘देवेन भारती यांनी माहिती लपविली’

च्मारिया यांनी बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाच्या तपासाबाबत म्हटले आहे की, तत्कालीन सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्याबद्दल चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली. शीना बोरा बेपत्ता झाल्याबाबत मी जेव्हा पीटर मुखर्जीला विचारले तेव्हा पीटरने आपण याबाबतची माहिती देवेन भारती यांना दिली होती, असे सांगितले.
च्वास्तविक, या प्रकरणी तपासाच्या अनुषंगाने भारती यांच्याबरोबर अनेकदा माझी चर्चा झाली. त्या वेळी त्यांनी त्याबाबत अवाक्षरही काढले नव्हते. त्यामुळे पीटरच्या कबुलीने मला धक्का बसला.
च्शीना बेपत्ता झाल्यासंदर्भात तक्रार किंवा आकस्मिक मृत्यूची नोंद का झाली नाही याबद्दल चर्चा केली तेव्हा देवेन भारती गप्प बसले. यानंतर मी देवेन भारती यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते.

Web Title: Pakistan's Left to Declare '9/11' Saffron Terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.