मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 04:25 PM2020-11-05T16:25:01+5:302020-11-05T16:26:02+5:30

Lifetime achievement award : महाराष्ट्र पक्षीमित्रचे पुरस्कार जाहीर 

Pakshimitra Jeevan Gaurav Award to Maruti Chitampally | मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार

मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार

Next

येत्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात सोलापूर येथे प्रदान केले जाणार पुरस्कार 

मुंबई : गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला. इतर पुरस्कारांमध्ये पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कारतांदलवाडी जि. जळगाव येथील उदय सुभाष चौधरी यांना तर पक्षी संशोधन पुरस्कार डॉ. अमोल सुरेश रावणकर अचलपूर व किरण मोरे, अमरावतीयांना विभागून देण्यात आला आहे. पक्षी जनजागृती पुरस्कारनाशिक येथील सतीश गोगटे यांना जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली असून पक्षिमित्रजीवन गौरव पुरस्कार, पक्षिमित्रपक्षी संवर्धन-सुश्रुषा पुरस्कार व पक्षी संशोधन पुरस्कार व पक्षीजनजागृती पुरस्कार असे चार पुरस्कार दरवर्षी देण्यात येत असतात. या पुरस्कारांचे वितरण पुढील 3४ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे. 

यावर्षीचा रमेश लाडखेडकर पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कारहा दीर्घकाळ पक्षिमित्र चळवळीत राहून, पक्षी संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत पक्षिमित्र चळवळीतील मार्गदर्शक, जेष्ठ सभासद, तथा पर्यावरण लेखक मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून या वर्षी हा पुरस्कार विदर्भ पक्षिमित्र मंच द्वारे डॉ. अनिल पिंपळापुरे यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे. दुसरा पुरस्कार डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती पक्षीमित्र पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कारहा पक्षिमित्र चळवळीतील पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन तथा जखमी पक्षी उपचार आदी क्षेत्रात कार्यरत पक्षिमित्र सभासद, तथा चातक संस्थेसोबत कार्यरत असलेले पक्षिमित्र उदय सुभाष चौधरी जि. जळगाव यांना जाहीर करण्यात आला आहे.रोख रक्कम, मानपत्र  आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कारस्व. डॉ. जी. एन. वानखेडे मेमोरिअल फंड तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे. 

यावर्षीचा तिसरा पुरस्कार डॉ. व्ही. सी. आंबेडकर स्मृती पक्षिमित्रपक्षीसंशोधन पुरस्कारहा पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास, संशोधन, प्रकाशने आणि जनजागृती आदी क्षेत्रात कार्यरत संशोधन क्षेत्रात कार्यरत सभासद डॉ . अमोल सुरेश रावणकर अचलपूर व किरण मोरे, अमरावती यांना विभागून देण्यात आला आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून या वर्षी हा पुरस्कार वाईल्डलाइफ हेरीटेज कन्झर्वेशन सोसायटी नाशिक तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे. चौथा पुरस्कार  ईश्वरदयाल गौतम स्मृती पक्षिमित्र पक्षीजनजागृती पुरस्कार हा पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास आणि जनजागृती आणि नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभ्यास आदी क्षेत्रात कार्यरत सभासदनाशिक येथील सतीश गोगटे यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी हा पुरस्कार नेस्ट संस्था (NEST), पालघर, व्दारा सचिन मेन यांचे तर्फेप्रायोजित करण्यात आलेला आहे.

या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार असून यावर्षी ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे २०२१ मध्ये होणार असून या पुरस्कारांचे वितरण या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी कळविली आहे. 

Web Title: Pakshimitra Jeevan Gaurav Award to Maruti Chitampally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.