Join us

पालघर विधानसभा पोट निवडणूक १३ फेब्रुवारीला

By admin | Published: January 13, 2016 12:36 AM

बहुप्रतिक्षेत असणारी पालघर विधानसभेची पोट निवडणूक १३ फेब्रुवारी रोजी व मतमोजणी १६ फेब्रुवारीला होणार असल्याचे निवडणूक आयोगाने आज जाहीर केले. त्यामुळे

पालघर : बहुप्रतिक्षेत असणारी पालघर विधानसभेची पोट निवडणूक १३ फेब्रुवारी रोजी व मतमोजणी १६ फेब्रुवारीला होणार असल्याचे निवडणूक आयोगाने आज जाहीर केले. त्यामुळे आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे.पालघर विधानसभा मतदार संघाचे आमदार कृष्णा घोडा यांचे २४ मे रोजी निधन झाल्यानंतर रिक्त जागेवर २७ मे रोजी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. परंतु आ. घोडा यांनी आपल्या उमेदवारी अर्जात मालमत्तेविषयी काही माहिती दडविल्या बाबतचा दावा काँग्रेसचे पराभूत उमेदवार राजेंद्र गावित यांनी उच्च न्यायालयात दाखल केल्याची माहिती कळाल्यानंतर आयोगाने ही निवडणूक पुढे ढकलली होती. त्यानंतर ती सहा महिन्याच्या आत घेणे अपेक्षीत असतानांही सहा महिने उलटले तरीही ती जाहीर होत नसल्याने सर्वपक्षांमध्ये अस्वस्थेतेचे वातावरण होते. ते आजच्या घोषणेमुळे संपुष्टात आले आहे.शिवसेनेतर्फे आ. कृष्णा घोडांचे सुपुत्र अमीत, तर काँग्रेसकडून राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीच्या वतीने मनिषा निमकर यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे वातावरण असून त्यांनी मागील ४-५ महिन्यापासून हा मतदारसंघ पिंजून काढायला सुरूवात केली होती. जाहीर कार्यक्रमानुसार २० जानेवारी ते २७ जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करणे, २८ जानेवारी रोजी छाननी, ३० जानेवारीला अर्ज माघारीची मुदत, १३ फेब्रुवारी रोजी मतदान तर १६ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शांत असलेले राजकीय वातावरण ढवळून निघणार असून सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआ, भाजप असा पंचरंगी सामना पहायला मिळण्याची शक्यता आहे.या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांची नेमणुक करण्यात आली असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चंद्रसेन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवडणूक सकाळी ८ ते ५ वा दरम्यान होणार आहे.