पालघर ते चर्चगेट लोकलसेवा लवकरच

By admin | Published: June 30, 2015 10:43 PM2015-06-30T22:43:44+5:302015-06-30T22:43:44+5:30

पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू दरम्यानच्या रेल्वेट्रॅकचे चौपदरीकरण करण्यासाठी १२०० कोटींची तरतूद करण्यात आली असून थेट पालघर ते चर्चगेट आणि पालघर

Palghar to Churchgate Local Airport soon | पालघर ते चर्चगेट लोकलसेवा लवकरच

पालघर ते चर्चगेट लोकलसेवा लवकरच

Next

पालघर : पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू दरम्यानच्या रेल्वेट्रॅकचे चौपदरीकरण करण्यासाठी १२०० कोटींची तरतूद करण्यात आली असून थेट पालघर ते चर्चगेट आणि पालघर ते दिवा अशी सेवा उपलब्ध व्हावी म्हणून आपण रेल्वेमंत्रालयापुढे प्रस्ताव सादर केल्याची माहिती खासदार चिंतामण वनगा यांनी दिली.
रोटरी क्लब आॅफ पालघरच्या वतीने पालघर रेल्वेस्टेशनवर वॉटर कुलरचे उद्घाटन पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या हस्ते पार पडले यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर रेल्वे व्यवस्थेवर प्रवाशांचा भार पडला असून डहाणू ते विरार दरम्यानच्या सर्व स्थानकांचा विस्तार करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी अद्ययावत आसनव्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय इ. सुविधा निर्माण केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगिले. या सर्व सुविधा निर्माण करताना पालघरसारख्या मुख्य रेल्वे स्थानकावर एकही शौचालय व स्वच्छतागृह नसल्याने महिलांची मोठी कुचंबणा होत असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता त्याचा प्रस्ताव मी डीआरएमकडे पाठविणार असल्याचे सांगितले. वैतरणा ते डहाणू दरम्यानच्या एकही रेल्वे स्थानकावर सुरक्षिततेच्या दृष्टीने एकाही सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय उपलब्ध नसल्याने रेल्वे पोलिसांना गुन्हेगारीचा छडा लावणे जिकरीचे होत असल्याबद्दलही छेडले असता या संदर्भात तत्काळ पावले उचली जातील असे शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी पालघरच्या नगराध्यक्षा अंजली पाटील, उपनगराध्यक्ष उत्तम घरत, रोटरीचे अध्यक्ष पद्म शर्मा, सचिव निनाद सावे, भगवान पाटील, लक्ष्मीदेवी हजारी, पो.नि. एस.सी. पिंपळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Palghar to Churchgate Local Airport soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.