Join us

पालघर जिल्ह्यात रणधुमाळी रंगणार

By admin | Published: October 06, 2015 11:23 PM

पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व काही ग्रा.पं.च्या पोटनिवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार असून एकूण आठ तालुक्यातील

- हितेन नाईक,  पालघरपालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व काही ग्रा.पं.च्या पोटनिवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार असून एकूण आठ तालुक्यातील १२६ ग्रामपंचायतीमधील २५४ रिक्त जागावरील उमेदवारासाठी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. याच दरम्यान पालघर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुक होण्याची शक्यता पाहता जिल्ह्यात रणधुमाळी रंगणार आहे.पालघर जिल्ह्यामधील पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, वसई या आठ तालुक्यातील राजकीय परिस्थिीती.१) वसई मधील सप्ताळा ग्रामपंचायत आणि पाली ग्रामपंचायतीमध्ये अनुक्रमे ११ व ७ जागासाठी सार्वत्रिक पोटनिवडणुका होत आहेत. तर खार्डी, अर्नाळा व अर्नाळा किल्ला या तीन ग्रामपंचायतीमध्ये रिक्त जागासाठी पोटनिवडणुका होणार आहेत.२) पालघर तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या ८० रिक्त जागासाठी निवडणुका होणार असून घिवली, नवी दापचरी, बिरवाडी, नागझरी, उच्छेळी, बेटेगाव, वेंगणी, नावझे, रावते, अक्करपट्टी, दारशेत, जायशेत, लोवरे, खैरग्रुप, चिंचारे, पथराळी, खडकोली, महागाव, गांजे ढेकाळे, गुंदले, डोंगरे, किराट, विरायन, बुद्रुक, तारापुर, काटाळे, कर्दळ, आलेवाडी, पडघे, शेलवली, नवी देलवाडी, एडवण, बऱ्हाणपुर, टेंभी, मोरेकुरण, नंडोरे, देवखोप, गिरनोली, वाकसई, खानिवडे-गारगाव व मान इ. ग्रामपंचायतीमधील निवडणुका होणार आहेत.३) जव्हार तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीमधील २६ रिक्त राहीलेल्या जागासाठी आकरे, बोराळे, चांभारशेत, धिवंडा, कासटवाडी, किरमिरा, कोरतड, नांदगाव, साकुर, वावर, विनवळ, रायतळे, चौक, हिरडपाडा, दसकोड, साखरशेत इ. ग्रा. प. मध्ये निवडणुका होणार आहेत.४) मोखाडा तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीमधील ७ रिक्त राहीलेल्या जागासाठी कुर्लोद, नाशेरा, खोडाळा, उधळे, पोशेरा ग्रा. प. मध्ये पोट निवडणुका होणार आहेत.५) विक्रमगड तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीमधील ६ रिक्त राहीलेल्या जागासाठी बांधण, टेटवाली, उपराळे, चिंचघर, डोल्हारी बुदू्रक ग्रा.प.मध्ये निवडणुका होत आहेत.६) डहाणू तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीमधील ७२ रिक्त राहीलेल्या जागासाठी अभ्रामधुमकेत, बोर्डी, बाडापोखरण, बहारे, चंडीगाव, दापचरी, दहयाळे, धाकटी डहाणू, गोवणे, सावटा, तडीयाळे, उर्से, वासगाव, वेती-वरोती, वाढवण, पोखरण, सारणी, जांबुगाव, जामशेत, कंक्राडी-नंडोरे, वरोर इ. ग्रा. प. मध्ये निवडणुका होणार आहे.७) तलासरी तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीमधील ११ रिक्त राहीलेल्या जागासाठी आमगाव, आच्छाड, कुर्झे, सावरोली-अणवीर, सुत्रकार, वेवजी, झाई-बोरीगाव, उपलाट, उधवा, करंजगाव ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत.८) वाडा तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीमधील ३१ रिक्त राहीलेल्या जागासाठी आखाडा, तुसे, हरोसाळे, शेले, ओगदा, मांडवा, गालतरे, गुहीर, शेल्टे, कळमखांड, कळंभे, निचोळे, सारशी, सापने बुदू्रक, उचाट, पिक शिलोत्तर, ब्राम्हणगाव इ. निवडणुका होणार असल्याचे राज्य निवडणुक आयोगाने कळविले आहे.