मुंबई: पालघरच्या डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना १६ मार्च रोजी घडली. या घटनेवरुन रविवारी सायंकाळपासून सोशल मीडियावर वादंग उठलं असून संबंधित घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तसेच या घटनेनंतर राज्य सरकारवरही मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. मनसेने देखील पालघरमधील सामूहिक हत्याकांडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आक्रमक सवाल विचारले आहे.
मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी ट्विट करत पालघरमधील हत्याकांबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कीर्तिकुमार शिंदे म्हणाले की, पालघर मॉब लिंचिंग घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोऱ्या वाजल्याचं सिद्ध झालंय. अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. जर गुन्हेगारांना त्याच दिवशी अटक केली होती, तर रात्री ११ वाजता तुम्ही हे जनतेला का सांगताय? त्याच दिवशी स्वतःहून ही माहिती जनतेला का दिली नाही असा सवाल कीर्तिकुमार शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री घडली. यावेळी समजूत घालण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी कासा पोलिसांनी ११० जणांना अटक केली आहे.
हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (३०), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०, रा. कांदिवली आश्रम) व चालक नीलेश तेलगडे (३०) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील दिवशी या ग्रामपंचायतमधील गडचिंचले येथे हा प्रकार घडला. मुंबईतील कांदिवली येथून सुरतकडे कारने जाणाऱ्या तिघांना गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून २५० ते ३०० च्या जमावाने रोखले. जमावाने त्यांच्यावर कोयती, कुऱ्हाडी आणि दगडांच्या सहाय्याने हल्ला केला. येथील वनचौकीवर कार्यरत वनरक्षकाने याची माहिती पोलिसांना दिली. तिथे आलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. त्यात चार पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांच्या चार गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पालघरमध्ये नेमकं काय घडलं?
डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री घडली. यावेळी समजूत घालण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी कासा पोलिसांनी ११० जणांना अटक केली. हा हल्ला गावात चोर आल्याच्या अफवेमुळे झाल्याचे समजते.