तर पालघर, ठाण्यात ४० टक्के पाणीकपात

By admin | Published: September 12, 2015 10:45 PM2015-09-12T22:45:38+5:302015-09-12T22:45:38+5:30

यंदा मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने एक महिना अधिक पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पाटबंधारे मंडळ, ठाणे यांनी ठाणे, कल्याण-

In Palghar, Thane, 40% watercolor | तर पालघर, ठाण्यात ४० टक्के पाणीकपात

तर पालघर, ठाण्यात ४० टक्के पाणीकपात

Next

ठाणे : यंदा मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने एक महिना अधिक पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पाटबंधारे मंडळ, ठाणे यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, वसई-विरार, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ व बदलापूर या नगरपालिकांना दिल्या आहेत. त्यानुसार, नोव्हेंबरमध्ये लागू होणारे नियोजन यंदा आॅक्टोबरपासून लागू होणार असून उपलब्ध पाणीसाठ्यानुसार आता १४ ऐवजी थेट ४० टक्के पाणीकपातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या १ आॅक्टोबरपासून ठाण्यासह पालघर जिल्ह्यावर पाणीबाणीचे संकट ओढवणार आहे.
मागील वर्षी जून ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत ३ हजार ते ३३०० मिमी पावसाची नोंद झाली होती. परंतु, यंदा मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ठाण्यासह पालघर जिल्ह्यात केवळ ५० टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे याचा परिणाम ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी, बारवी आणि आंध्रा डॅमवर झाला आहे. येथील धरणांचा पाणीसाठा पाहता १ आॅक्टोबरपासून पुढील २८८ दिवसांचे नियोजन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांना करावे लागणार आहे. यापूर्वी १ नोव्हेंबर ते १५ जुलै अशा २५७ दिवसांच्या कालावधीचे नियोजन केले जात होते. परंतु, आता एक महिना आधीच ते करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाने दिल्या आहेत. त्यामुळेच यंदा १४ ऐवजी ४० टक्के पाणीकपात करावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात आजघडीला केवळ ७० टक्के पाणीसाठा असून त्याचा परिणाम मुंबई व ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे.
यासंदर्भात आता ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पुढील आठवड्यात आयुक्तांसमवेत बैठक बोलवली असून शहरात कशा पद्धतीने पाणीकपात केली जाणार, याचे धोरण निश्चित केले जाणार आहे.
परंतु, मिळालेल्या माहितीनुसार सध्या ज्या ठिकाणी दोन वेळेस पाणीपुरवठा होत आहे, त्या ठिकाणी एकदाच तर काही ठिकाणचे तास कमी केले जाणार आहेत. तर, काही भागात दिवस विभागून पाणीकपात केली जाण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

पाण्याचे नियोजन करताना सर्व महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा यांच्या वितरण प्रणालीमधील गळती कमी करण्यासाठी कार्यवाही करावी, इमारत बांधकाम, स्वीमिंगपूल, बागबगीचे आदींसाठी शक्यतो पाणी देऊ नये, पेयजल आदी मोठ्या प्रमाणातील पाणीवापर करणाऱ्या व्यावसायिकास प्रतिबंध करावा, पावसाच्या परतीच्या कालावधीत पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नाही तर येत्या १ आॅक्टोबरपासून ४० टक्के कपात करावी लागणार असल्याने त्याची जनजागृती करावी, अशीही सूचना देण्यात आली आहे.

Web Title: In Palghar, Thane, 40% watercolor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.