नवनिर्मित पालघर सर्वोत्कृष्ट जिल्हा ठरेल!

By admin | Published: August 2, 2014 01:15 AM2014-08-02T01:15:27+5:302014-08-02T01:15:27+5:30

आदिवासी बांधवांचा हक्काचा जिल्हा बनणार, त्यांना न्याय मिळणाऱ़़ या आशेने शासननिर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या तमाम नागरिकांच्या डोळ्यांचे आज पारणे फिटले

Palghar will be the best district! | नवनिर्मित पालघर सर्वोत्कृष्ट जिल्हा ठरेल!

नवनिर्मित पालघर सर्वोत्कृष्ट जिल्हा ठरेल!

Next

बोईसर/केळवे-माहीम : आदिवासी बांधवांचा हक्काचा जिल्हा बनणार, त्यांना न्याय मिळणाऱ़़ या आशेने शासननिर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या तमाम नागरिकांच्या डोळ्यांचे आज पारणे फिटले. त्यांचा हक्काचा जिल्हा आज शुक्रवारी त्यांना मिळाला आणि आदिवासी बांधव आणि ठाण्यातील जव्हार, डहाणू, मनोरच्या पाड्यांतील नागरिकांना अश्रू आवरले नाहीत.
२६ जानेवारी, १५ आॅगस्ट अशी डेडलाइन या विभाजनाला देण्यात येत होती. तारीख पे तारीख पडत असताना अखेर जिल्हानिर्मितीसाठी १ आॅगस्ट उजाडावा लागला. मुख्यमंत्री पालघरात आले आणि त्यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात पालघर जिल्ह्याच्या इमारतीच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला. कुपोषण, रोजगार, आदिवासी विकास, उद्योगधंदे अशा विविध समस्यांचे त्रांगडे झेलणारा हा परिसर आतातरी समस्यांच्या जंजाळातून मुक्त होणार, कुपोषणाचा प्रश्न निकाली निघणार, असा आशावाद नागरिकांना आहे.
पालघरात पहिल्या दिवसापासून जिल्हा कार्यालय सुरू केले असून भविष्यात सर्व सुखसोयीने युक्त असा पालघर जिल्हा नावारूपाला येईल, तर पालघर जिल्ह्याचे टाऊन प्लानिंंंग विशेषत: जो प्रशासकीय भाग आहे, तो भाग देशातील एक सर्वोत्कृष्ट जिल्हा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
पालघर जिल्ह्याच्या उद्घाटनाचे व महसूल दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-स्कॅनिंग, ई-म्युटेशन, ठाणे प्रतिबिंब (किआॅस्क) व परिवार कवच (कुटुंब दाखले पुस्तिका) या चार लोकाभिमुख योजनांना सुरुवात करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी विविध विभागांची कामे उत्सुकतेने जाणून घेतली आणि महत्त्वाच्या सूचनाही केल्या. नव्या जिल्ह्याचे काम तेवढ्याच तत्परतेने करून आदिवासी समाजाचा असलेला हा जिल्हा तेवढाच पुढे नेऊन समाजाचा विकास करा, असा सल्लाही त्यांनी दिला. (वार्ताहर)

Web Title: Palghar will be the best district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.