मुंंबई : पालघर जिल्ह्यातील वसईत राहणाऱ्या ४२ वर्षांच्या अमिता राजानी यांनी ३०० किलो वजनावरून चार वर्षांनंतर थेट ८६ किलो वजन गाठले आहे. राजानी यांचा हा चार वर्षांचा प्रवास थक्क करणारा असून, बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेमुळे त्यांना नवसंजीवनी प्राप्त झाली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांचे वजन १२६ किलो होते, तर शस्त्रक्रियेपूर्वी तब्बल आठ वर्षे त्या अंथरुणाला खिळून होत्या.राजानी यांच्यावर २०१५ साली पहिल्या टप्प्यातील लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोनॉमी ही चयापचय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर, त्यांची परिस्थिती सुधारू लागली आणि त्यांचे बरेचसे वजन कमी झाल्याने त्या स्वत:हून चालू लागल्या. २०१७ साली अमिता यांच्यावर दुसरी गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी त्यांचे वजन १४० किलो होते. हे दोन चयापचय उपचार आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांचे वजन कमी झाले. त्यांची शस्त्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडली. त्यांना अतिस्थूलपणाचा विकारासह त्यांच्या कोलेस्टरॉलची पातळी असंतुलित होती, मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड झाला होता, तर टाईप २ प्रकारचा मधुमेह आणि श्वसनाच्याही समस्या होत्या.ही शस्त्रक्रिया करणाºया डॉ. शशांक शहा यांनी याविषयी सांगितले की, वयाच्या सहाव्या वर्षांपासून त्यांचे वजन वाढण्यास सुरुवात झाली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांचे वजन १२६ किलो होते. आपल्या दैनंदिन क्रियासुद्धा त्या व्यवस्थितपणे करू शकत नव्हत्या. त्या आशियातील सर्वाधिक वजन असलेल्या महिला होत्या. त्यांचे वजन ३०० किलोपर्यंत पोहोचले, तेव्हा परिस्थिती अजूनच गंभीर झाली आणि त्यांना घराबाहेर पडणेही शक्य नव्हते. त्याचप्रमाणे, अमिता यांना श्वसनाच्या समस्यांमुळे आॅक्सिजनचा सपोर्ट लागत असे.अमिता यांच्यासारख्या काही प्रकरणांमध्ये हा असंतुलितपणा गंभीर स्वरूप धारण करतो, पण शस्त्रक्रियेच्या चार वर्षांनंतर त्या मधुमेह आणि रक्तदाबासारख्या आरोग्याच्या समस्यांपासून दूर आहेत. त्यांचे मूत्रपिंड सामान्यपणे कार्य करत आहे आणि त्यांना आहाराचे पथ्य पाळण्यास सांगितले आहे. अमिताची केस लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडर््समध्ये नोंदविण्याच्या प्रयत्नांत आहोत, अशी पुष्टी त्यांनी जोडली. अमिता राजानी म्हणाल्या, पूर्वी खाटेला खिळलेली होते आणि आता स्वतंत्र आहे आणि मुक्तपणे हालचाल करू शकते. माझ्या आवडीचे कपडे घालू शकते आणि हवे तसे आयुष्य जगू शकते. माझ्या आनंदाला पारावार राहिलेला नाही.महिलांमध्ये स्थूलपणा अधिककर्करोग किंवा एचआयव्हीएवढाच स्थूलपणा हा गंभीर आजार आहे. सगळ्या आजारांचे हे मूळ असते आणि पुरुषांच्या तुलनेने महिलांना हा आजार अधिक प्रमाणात होतो. कारण महिलांमध्ये प्रसूती किंवा रजोनिवृत्तीसारखी शारीरिक कारणे असतात आणि पुरुषांमध्ये अॅबडॉमिनल ओबेसिटी म्हणजेच पोटाकडील भागाचा स्थूलपणा असतो.पोटाच्या भागात स्थूलपणा वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि हृदयविकारांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे, महिलांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक वजन असणे हे भावनिकदृष्ट्या अधिकत्रासदायक असते.
पालघरच्या महिलेने घटवले तब्बल २१४ किलो वजन! चार वर्षे सुरू होते उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 2:58 AM