पान २....स्मार्टकार्ड कंपनीने लुबाडले
By admin | Published: December 3, 2014 11:06 PM2014-12-03T23:06:10+5:302014-12-03T23:06:10+5:30
स्मार्टकार्ड कंपनीने लुबाडले
Next
स मार्टकार्ड कंपनीने लुबाडलेकर्नाटकमध्ये ६६ रूपये, महाराष्ट्रात ३९४ रूपयेदर महिना ७़८८ कोटींचा कंपनीला नफाराज्य शासनाचा हायकोर्टात दावा मुंबई : आरसी बुकचे स्मार्टकार्ड देणार्या कंपनीने महाराष्ट्रातील नागरिकांना लुबाडले असून कर्नाटकात हे कार्ड ६६ रूपयांत दिले जाते तर राज्यात यासाठी ही कंपनी ३९४ रूपये आकारते़ तसेच दर महिना या कंपनीला ७़८८ कोटी रूपये मिळतात, असा आरोप सरकारी वकील धैर्यशील नलवडे यांनी बुधवारी उच्च न्यायालयात केला़याचे रितसर प्रतिज्ञापत्रही शासनाने सादर झाले आहे़ या कंपनीचे कंत्राट शासनाने संपुष्टात आणले़ मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता हे कंत्राट संपवल्याचा आरोप करत कंपनीने न्यायालयाचे दार ठोठावले़ न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ त्यात ॲड़ नलवडे यांनी हा दावा केला़ तसेच यासाठी नव्याने निविदा मागवल्या असून सर्वांत कमी बोली लावणार्या कंपनीला याचे कंत्राट दिले जाणार आहे, असेही ॲड़ नलवडे यांनी स्पष्ट केले़ या सुनावणीला परिवहन आयुक्त महेश झगडेही हजर होते़ मात्र कंपनीला एक कोटी गाड्यांना आरसी बुकचे स्मार्टकार्ड देण्याचे उद्दिष्ट होते़ अशा प्रकारे २१ राज्यात स्मार्टकार्ड दिले जाते़ त्यामुळे पुढील निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कंपनीला हे काम सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती कंपनीने न्यायालयाला केली़ यावरील पुढील सुनावणी उद्या गुरूवारी होणार आहे़ (प्रतिनिधी)