पंचनाम्याची प्रक्रिया थांबली

By admin | Published: December 15, 2015 02:23 AM2015-12-15T02:23:30+5:302015-12-15T02:23:30+5:30

कांदिवली येथील दामूनगर आणि भीमनगर येथे लागलेल्या आगीतील सुमारे २०० पीडितांचा पंचनामा झालाच नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाने येथील पंचनाम्याचे काम थांबवल्याने ही

Panchnama process stopped | पंचनाम्याची प्रक्रिया थांबली

पंचनाम्याची प्रक्रिया थांबली

Next

मुंबई : कांदिवली येथील दामूनगर आणि भीमनगर येथे लागलेल्या आगीतील सुमारे २०० पीडितांचा पंचनामा झालाच नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाने येथील पंचनाम्याचे काम थांबवल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील तीन दिवसांपासून पंचनाम्याची प्रकिया थांबल्याचे सुत्रांनी सांगितले.
आगीची दुर्घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून समता नगर पोलिसांनी येथील पंचनामाचे काम सुरु केले. हे काम अंत्यत वेगाने आणि शिस्तबध्द झाले. मात्र जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि वनविभागाने दोन दिवसांत घाईघाईने पंचनाम्याचे काम उरकले. आणि पिडीतांना ३ हजार ८०० रुपये एवढी तुटपुंजी मदत करत हात वर केले. परिणामी आता स्थानिकांमध्ये असंतोष पसरला असून, बाधितांचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी भिमनगर (दामुनगर) आपातग्रस्त आणि रिलिफ संघाने केली आहे. दरम्यान, बहुजन हिताय संघ (मुंबई), पालघर, अलिबाग, पिपल्स इम्प्रुमेंट ट्रस्ट, प्रबुद्ध महिला मंडळ व बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या ऋणानुबंध अभियान संयुक्त विद्यमाने दामुनगर पिडीतांसाठी १२०० भांडी, १२०० बादल्या, १२०० बेडशीट, टॉवेल, साबण, डिश आणि ग्लास अशा सुमारे दोन लाख रुपयांच्या साहित्याचे वाटप माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते येथे करण्यात आले. या वेळी योगेश वऱ्हाडे, नागसेन सोनारे, आर. एल . अबुटे, गवारे, विजय रणपिसे, अशोक सावखंडे, विद्या ससावखंडे, प्रकाश गाडे, महेश राऊत, संगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

३ हजार ८०० रुपयांची तुटपुंजी मदत करून सरकारने पिडीतांची चेष्टा केली आहे.
- संजय निरुपम,
मुंबई अध्यक्ष, काँग्रेस

ज्याचे पंचनामे शिल्लक आहेत.
त्यांचे पंचनामे जिल्हाधिकारी कार्यालयाने लवकर करावेत.
त्यांना नुकसान भरपाई द्यावी.
- सचिन सांवत, प्रवक्ता, काँग्रेस

Web Title: Panchnama process stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.