पंढरीनाथ सावंत यांना साहित्य जीवनगौरव
By Admin | Published: June 2, 2017 06:09 AM2017-06-02T06:09:14+5:302017-06-02T06:09:14+5:30
यूआरएल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यूआरएल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी सामाजिक व साहित्यिक
क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.
या वर्षी हा सामाजिक गौरव पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे बीड येथील दीपक नागरगोजे व सातारा येथील डॉ. अविनाश पोळ यांना प्रदान करण्यात आला. तर यंदाचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना देण्यात आला. तसेच अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर
यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा सामाजिक गौरव पुरस्कार सातारा येथील प्रशांत पोतदार यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार वितरण सोहळा यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे संपन्न झाला. या सोहळ्यास प्रमुख अतिथी डॉ. विकास आमटे (सचिव - महारोगी सेवा समिती, आनंदवन), सुप्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर, यूआरएल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष उदयदादा लाड, सुप्रसिद्द कवी रामदास फुटाणे, डॉ. वि. ना. श्रीखंडे यांच्यासहित सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.