विद्यार्थी-पालकांची निकालाच्या भीतीने उडणार ‘गुणकोंडी’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 03:56 AM2020-04-14T03:56:45+5:302020-04-14T03:57:00+5:30

पेपर रद्द झाल्याने सुटकेचा नि:श्वास; गुणपद्धती जाहीर न केल्याने संभ्रम

'Pandit Kondi' will fly in fear of student-parent results | विद्यार्थी-पालकांची निकालाच्या भीतीने उडणार ‘गुणकोंडी’

विद्यार्थी-पालकांची निकालाच्या भीतीने उडणार ‘गुणकोंडी’

Next

मुंबई : दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्याची शिक्षणमंत्र्यांनी केली आणि लॉकडाऊन कालावधीत दहावीच्या पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र दहावीच्या निकालाच्या वेळी या रद्द केलेल्या परीक्षांची गुणपद्धती नेमकी काय असणार? समाजशास्त्र विषयाचे एकूण गुण ग्राह्य धरताना त्यात भूगोलाच्या पेपरचे गुण ग्राह्य धरणार का ? धरलेच तर कोणत्या आधारावर भूगोलाच्या गुणांची सरासरी काढली जाणार? असे एक ना अनेक प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जाऊ लागले आहेत. त्यामुळे एकीकडे पालक विद्यार्थ्यांनी पेपर रद्द झाला म्हणून सुटकेचा नि:श्वास जरी सोडला असला तरी दुसरीकडे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ रद्द झालेल्या पेपर संदभार्तील गुणपद्धती आणि पुढील कार्यवाही कशी करणार अशा प्रश्नांनी त्यांना बुचकळ्यात पाडले असून त्यांची गुणकोंडी झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रचलित व विहित कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत कार्यवाही करण्यात येईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले असले तरी पुढील कार्यवाहीबाबत खुद्द राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, दहावीच्या भुगोलाच्या विषयाला विद्यार्थ्यांना नेमके कसे गुण द्यायचे याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, याबाबत मंडळ विविध पयार्यांवर विचार करून योग्य तो निर्णय घेईल असे मंडळाकडून संगण्यात येत आहे. इतिहास विषयाला धरून सरासरी गुण दिले तर एखाद्याला इतिहास विषय अवघड गेला तर त्याला भुगोलातील कमी पडतील असे शिक्षकांचे म्हणणे आहे.
इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना इतिहास हा विषय अवघड जातो. यामुळे गुण कमी पडल्यास अनेक विद्यार्थी नाराज होऊ शकतील तसेच काही जण न्यायालयातही दाद मागू शकतील असे मत काही शिक्षक व्यक्त करत आहेत. तर सध्या ५५० गुणांची परीक्षा झाली असून त्याच गुणांच्या आधारे निकाल द्यावा कारण बेस्ट आॅफ फाईव्हच्या आधारावरच अकरावी प्रवेश आणि निकाल दिला जातो. यामुळे याबाबत अधिक गोंधळ न वाढवता विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी प्रतिक्रिया बोरीवलीच्या सुखदा परांजपे या पालकाने व्यक्त केली.

रद्द झालेल्या पेपरनंतर काय असणार पर्याय?
च्भूगोल विषयाचा पेपर रद्द झाल्याने उरलेल्या इतर सर्व विषयांत मिळालेल्या गुणांची सरासरी काढून भूगोल विषयाच्या एकूण गुणांपैकी गुण द्यावे.
च्इतिहास विषयाचा पेपर झाला आहे, तेव्हा या मिळालेल्या गुणांच्या सरासरीएवढे गुण भूगोल विषयांत दिले जाऊ शकतात.
च्भूगोल विषयाचा पेपर रद्द झाला असून सध्या ५५० गुणांची परीक्षा झाली आहे. याच गुणांच्या आधारे निकाल द्यावा कारण अकरावी प्रवेश हे बेस्ट आॅफ फाईव्ह म्हणजेच ५०० गुणांपैकी मिळालेले गुण धरूनच होतात
च्भूगोलाचा हा पेपर रद्द झाला असला तरी शाळेत झालेल्या पूर्वपरीक्षांचा आधार घेत त्यातील भूगोलाचे गुण ग्राह्य धरले जाऊ शकतात.

काही विद्यार्थ्यांना भूगोल विषयांत चांगले गुण मिळतात. त्यांचे समाजशास्त्र विषयाचे गुण इतर विषयांपेक्षा अधिक चांगले असतात, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. - अनुश्री जठार, विद्यार्थिनी

आता भूगोलाचा पेपर रद्द झाला आहे, मात्र आमच्या पूर्वपरीक्षा शाळेत झाल्या होत्या. त्या आधारावर आम्हाला या परीक्षेत गुण देता आले तर बेस्ट आॅफ फाईव्हच्या वेळी समाजशास्त्रातील कमी गुणांमुळे आमची अडचण होणार नाही
- प्रियांका कळंबे, विद्यार्थिनी

Web Title: 'Pandit Kondi' will fly in fear of student-parent results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.