मुंबई : ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर ब्रिटिशांनी प्रत्येक जिल्ह्याची गॅझेटिअर्स काढली व या गॅझेटिअर्समध्ये किल्ल्यांची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर ना या किल्ल्यांची डागडुजी करण्यात आली ना आढावा घेण्यात आला. आता शासनाने याच कामासाठी गड संवर्धन समिती नेमली असून ही समिती सर्व किल्ल्यांच्या व्यापक सर्वेक्षणाची मोहीम हाती घेणार आहे, असे गड-संर्वधन समितीचे प्रमुख मार्गदर्शक पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले.महाराष्ट्र शासनाने पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली गड-संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कायर्शाळेचे रविवारी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कोकण विभागातील दुर्गप्रेमींकरता त्यांना योग्य व परिणामकारक सहभाग देणे शक्य व्हावे यासाठी ही कायर्शाळा आयोजित केली होती.दिवसभर चाललेल्या या कायर्शाळेमध्ये ‘दुर्ग-संवर्धन - व्याप्ती, महत्त्व, कार्यप्रणाली व दुर्गप्रेमींचा सहभाग या विषयावर डॉ. अभिजीत खांडेकर, किल्ल्यांचे नकाशे व रेखाटन या विषयावर डॉ. सचीन जोशी, दुर्गसंवर्धन नियम व संकेत, बांधकामात चुन्याचे महत्त्व व बांधकामावरील झाडे काढणे, तोफांचे महत्त्व व जतन या विषयावर डॉ. तेजस गर्जे तर गड-संवधर्नात दुर्गप्रमींच्या सहभागाचे महत्त्व या विषयावर भालचंद्र कुलकर्णी इ. वक्त्यांनी अभ्यासपूर्ण अशी व्याख्याने दिली. (प्रतिनिधी)
गड-किल्ल्यांचे सर्वेक्षण करणार - पांडुरंग बलकवडे
By admin | Published: August 10, 2015 1:15 AM