पांडुरंगाची कृपेने वाचलो; अन्यथा माझाच गेम झाला असता - कराडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 04:10 AM2020-01-10T04:10:52+5:302020-01-10T04:10:58+5:30

परळी येथे कार्यक्रम असल्याने मी रात्रीच पंढरपूर सोडले त्यामुळे मी वाचलो, अन्यथा बाजीराव जगताप याने माझाच गेम केला असता.

 Panduranga gracefully survived; Otherwise my game would have been - Karadkar | पांडुरंगाची कृपेने वाचलो; अन्यथा माझाच गेम झाला असता - कराडकर

पांडुरंगाची कृपेने वाचलो; अन्यथा माझाच गेम झाला असता - कराडकर

Next

बाळासाहेब बोचरे 
मुंबई : परळी येथे कार्यक्रम असल्याने मी रात्रीच पंढरपूर सोडले त्यामुळे मी वाचलो, अन्यथा बाजीराव जगताप याने माझाच गेम केला असता. पांडुरंगाची कृपा म्हणून मी वाचलो, अशी प्रतिक्रिया ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी दिली.
दोन दिवसापूर्वी पंढरपुरात कराडकर मठाचे मठाधिपती जयवंत बुवा यांची निर्घृण हत्या केल्यानंतर मारेकरी बाजीरावमामाने पोलिसांना दिलेल्या जबानीत बंडातात्या यांचा खून करण्याचा इरादा असल्याचे स्पष्ट केले. याबाबत बंडातात्या म्हणाले, अलीकडची त्याची वर्तणूक पाहता त्याने नक्कीच माझा गेम केला असता यात शंका नाही. वास्तविक मी जेव्हा झोपतो तेव्हा गाढ झोपतो हे त्याला माहीत होते. त्या दिवशी जयवंत महाराजांचा निरोप घेऊन मी परळीच्या दिशेने निघालो. बार्शीत मुक्काम करून सकाळी परळीला जाण्याचा बेत होता. त्यामुळे मी वाचलो.
आरोपी बाजीराव मामा आणि जयवंत बुवा दोघांनी आळंदीतून वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतले आहे. कराडकर मठाच्या मठाधिपतींच्या निधनानंतर वारकरी संप्रदायातील व्यक्ती म्हणून बाजीराव मामाची निवड ट्रस्टने केली. परंतु वारकरी संप्रदायाशी त्याची सांगड जुळेना म्हणून विश्वस्तांनी जयवंत महाराज यांची निवड केली. विद्यमान मठाधिपती निर्वतल्यानंतर नवीन मठाधिपती निवडण्याची कराडकर मठात परंपरा आहे. पण याबाबतीत तो अपवाद घडल्याने याचा बाजीरावला राग आला. मग त्याने कोर्टकचेरी केली. दोन्ही कोर्टाचे निकाल त्याच्या विरोधात गेल्याने त्याचा संयम सुटला आणि त्याने जयवंत महाराजांचा खून केला असावा, असे बंडातात्या म्हणाले.
बाजीराव मामाचा तुमच्यावर राग का, यावर बंडातात्या म्हणाले, ‘‘नवीन मठाधिपती निवडण्याबाबत विश्वस्तांनी मला सल्ला विचारला तेव्हा मी जयवंत महाराजांचे नाव सुचवले होते. त्यामुळे त्याचा माझ्यावर राग असावा. वास्तविक विद्यार्थिदशेत असताना जयवंत महाराज व बाजीराव मामा दोघेही मला आदर्श मानत होते. पण मठाधिपतीच्या वादाने कळस केला आणि जयवंत मामाचा प्राण गेला. त्याच्या मनात सूडाची भावना एवढी ठासून भरली होती, की निष्प्राण झाल्यानंतरही बाजीराव जयवंत महाराजांचा गळा चिरत होता. बाजीराव चे हे कृत्य अजमल कसाबला ही लाजवणारे आहे.असे म्हणावे लागेल असे बंडातात्या शेवटी म्हणाले.
सर्वांनाच बसला धक्का
एकमेव व्यसनमुक्त दिंडी म्हणून ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात कराडकर दिंडीकडे पाहिले जाते. सोहळ्यातील सर्वात शिस्तबद्ध अशी ही दिंडी आहे. ज्ञानेश्वरी पारायण प्रत, तुकाराम महाराजांची गाथा, भजनी मालिका प्रमाण म्हणून याच फडावरून खरेदी करतात. अगदी वारकरी प्रमाणभूत पताकाही याच फडावर उपलब्ध असतात. एक निष्ठावान फड, आदर्श तरुण वारकऱ्यांची फळी कराडकर मठाने उभी केली आहे. तेथे ही घटना घडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Web Title:  Panduranga gracefully survived; Otherwise my game would have been - Karadkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.