मुंबई : ग्रामविकास आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे मंगळवारी मुंबईत असूनही मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे तर्कवितर्क लढविले जात होते.२०१४च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅकिंगद्वारे विजय मिळविण्यात आला, हे भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना माहिती असल्याने व ते तसे जाहीर करण्याची शक्यता असल्याने त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप सायबरतज्ज्ञ सईद शुजा याने केल्यानंतर खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी आज माध्यमांना सामोरे जाण्याचे टाळले. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या पेडर रोडवरील सरकारी बंगल्यावर संपर्क साधला, पण पंकजा यांनी कुणाशीही बोलण्याचे टाळले. पंकजा यांनी माध्यमांना सामोरे जावे, असे प्रयत्न एका ज्येष्ठ भाजपा मंत्र्याने केले, पण त्यांनी नम्रपणे नकार दिला, असे सूत्रांनी सांगितले.गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची रॉ मार्फत चौकशी करावी, अशी मागणी पंकजा यांचे चुलत बंधू आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मुंबईत असूनही पंकजा मुंडे मंत्रिमंडळ बैठकीस गैरहजर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:29 AM