पंकजा मुंडेंनी शब्द पाळला, अखेर ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 09:32 PM2019-09-13T21:32:10+5:302019-09-13T21:32:28+5:30

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष केला, लढा दिला.

Pankaja Munde followed the word, eventually establishing the usstod Labor Corporation | पंकजा मुंडेंनी शब्द पाळला, अखेर ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना

पंकजा मुंडेंनी शब्द पाळला, अखेर ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना

googlenewsNext

मुंबई - राज्य सरकारने दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळाच्या स्थापनेचा आदेश निर्गमित केला आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार केशवराव आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून वाट पाहणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या महामंडळाची स्थापन करण्यात आली आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. विशेष म्हणजे या मंडळाची घोषणाच त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केली होती.  

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष केला, लढा दिला. सरकारने त्यांच्या नांवाने स्थापन केलेले ऊसतोड महामंडळ हा राज्यातील तमाम ऊसतोड मजूरांच्या भावनेचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी महामंडळ लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी ऊसतोड संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. सुरवातीला महामंडळाऐवजी ऊसतोड कामगार योजना करण्यात आली होती. पण, ऊसतोड मजूरांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने महामंडळाच स्थापन करावे, यासाठी पंकजा मुंडेंनी आग्रह धरला होता. तसेच, महामंडळाचा आराखडाही अंतिम केला. अखेर पंकजा मुंडेंच्या प्रयत्नांना यश आले असून सरकारने 'गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ' स्थापन केले व तसा आदेश निर्गमित केला. आहे. 

'गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ' असे नांव या महामंडळाचे असणार आहे, या महामंडळासाठी आकस्मिकता निधीमधून 145 कोटी इतका निधी मंजूर करण्यात यावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार केशवराव आंधळे यांच्या नावांची शिफारस करण्यात आली असून अन्य आठ सदस्यही त्यात असणार आहेत. दरम्यान, राज्यातील तमाम ऊसतोड मजूरांच्या भावना लक्षात घेऊन गोपीनाथ मुंडेंच्या नावाने महामंडळ स्थापन केल्याने उसतोड कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.
 

Web Title: Pankaja Munde followed the word, eventually establishing the usstod Labor Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.