एकनाथ खडसेंवरील ED चौकशीबाबत पंकजा मुंडेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 02:24 PM2021-07-09T14:24:46+5:302021-07-09T14:25:20+5:30

फडणवीस सरकारमध्ये महसूलमंत्री असताना खडसे यांची पत्नी मंदाकिनी  खडसे व जावई चौधरी यांनी भोसरीतील ३.१ एकर भूखंड खरेदी केला.

Pankaja Munde spoke clearly about the ED interrogation on Eknath Khadse | एकनाथ खडसेंवरील ED चौकशीबाबत पंकजा मुंडेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं

एकनाथ खडसेंवरील ED चौकशीबाबत पंकजा मुंडेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं

Next

मुंबई - पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे पाच वर्षांपूर्वी झालेल्या भूखंड खरेदी गैरव्यवहारप्रकरणी राज्याचे माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी तब्बल नऊ तास कसून चौकशी केली. अटकेत असलेले त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना समोर बसवून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सकाळी अकराला हजर झालेले खडसे रात्री आठ वाजता ईडी कार्यालयातून बाहेर पडले. याप्रकरणी राज्यातील भाजपविरोधी पक्षांकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप होत आहे. आता, पंकजा मुंडेंनी याबाबत स्पष्ट शब्दात मत मांडलं आहे.  

फडणवीस सरकारमध्ये महसूलमंत्री असताना खडसे यांची पत्नी मंदाकिनी  खडसे व जावई चौधरी यांनी भोसरीतील ३.१ एकर भूखंड खरेदी केला. एमआयडीसीतील ही जमीन सरकारी असताना ती बाजार मूल्यापेक्षा कमी म्हणजे ३.१ कोटींना खरेदी केल्याचा आरोप खडसे कुटुंबीयांवर होत आहे. चार कथित कंपन्यांतून बेसकोम बिंट्कॉन कंपनीमार्फत वर्ग करण्यात आलेल्या रकमेबद्दलही त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली. या कारवाई आणि चौकशीला राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने हेतुपुरस्कृत असल्याचे म्हटले आहे. तसेच, राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई होत असल्याचं म्हटलंय. तर, पंकजा मुंडे यांनीही स्पष्ट शब्दात आपलं मत व्यक्त केलं आहे.  

ईडी, सीबीआय आणि सीआयडी या मोठ्या तपास यंत्रणा आहेत, त्यांच्यावर मीडियातून भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. आपण त्या एजन्सीवर जेवढं कमी भाष्य करू, तेवढं त्यांच्याकडून न्याय होईल. त्यामध्ये कुणी चुकीचं असेल तर तसा न्याय होईल, कुणी बरोबर असेल त्याचाही न्याय होईल. आपण त्यास डिस्टर्ब करू नये. खडसेंवरील ईडीच्या कारवाईवर मी भाष्य करणं योग्य नाही, कारण मी त्यातील एक्सपर्ट नाही, असे पंकजा मुंडेंनी स्पष्टच म्हटलं आहे. 

खडसेंबाबत भाजपकडून ईडीचा गैरवापर  
एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करीत आहे. खडसे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचे काहीही केलेले नाही. खडसे कुटुंबाने एक जागा रितसर घेतली. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. मात्र तरीही कुभांड रचून त्यांना राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

कारवाई राजकीय सुडापोटी खडसेंचा भाजपवर आरोप -
भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणात आतापर्यंत पाचवेळा चौकशी झाली आहे. कोणताही गैरव्यवहार झाला असल्याचे स्पष्ट झाले नसताना ईडीकडून करण्यात येत असलेल्या कारवायांमागे राजकीय सुडाचा वास आहे. मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानेच माझ्यावर चौकशी सुरू आहे, असा आरोप खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

Web Title: Pankaja Munde spoke clearly about the ED interrogation on Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.