Join us

Pankaja Munde : तेव्हाही तूच जबाबदारी सांभाळली अन् आजही; खासदार मुंडेंकडून 'तो' फोटो शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 3:57 PM

प्रीतम मुंडे यांनी ट्विटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, लहानपणीचा फोटो सगळ्यांचेच लक्ष वेधतो. या फोटोसह इतरही दोन फोटो प्रीतम यांनी शेअर केले आहेत. त्यासोबतच, भावनिक आठवण आणि संदेशही दिला आहे

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रीतम मुंडे यांनी तीन फोटो ट्विट केलेत. या तिन्ही फोटोत दोन्ही बहिणी आहेत, त्यातला पहिला फोटो हा दोघींच्या लहानपणीचा आहे. त्याच फोटोत पंकजा मुंडेंनी कानाला फोनचा रिसिव्हर लावलेला आहे.

मुंबई - भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा आज 42 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्या निमित्ताने विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून त्यांन शुभेच्छा देण्यात येत आहेत. सोशल मीडियातूनही पंकजा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे पंकजा यांच्या लहान बहिण आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी भावनिक शब्दात पंकजा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रीतम यांनी ट्विटवरुन एक फोटोही शेअर केला आहे. 

प्रीतम मुंडे यांनी ट्विटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, लहानपणीचा फोटो सगळ्यांचेच लक्ष वेधतो. या फोटोसह इतरही दोन फोटो प्रीतम यांनी शेअर केले आहेत. त्यासोबतच, भावनिक आठवण आणि संदेशही दिला आहे. '5 वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही आहेस. जिच्या छायेत सुरक्षित वाटतं, त्या आभाळाएवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा... असे प्रीतम यांनी म्हटलं आहे.  पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रीतम मुंडे यांनी तीन फोटो ट्विट केलेत. या तिन्ही फोटोत दोन्ही बहिणी आहेत, त्यातला पहिला फोटो हा दोघींच्या लहानपणीचा आहे. त्याच फोटोत पंकजा मुंडेंनी कानाला फोनचा रिसिव्हर लावलेला आहे. तर प्रीतम मुंडे ह्या बाजुला बसून हसतायत. त्यांच्या ओठीत एक बाहुलीही आहे. विशेष म्हणजे दोन्ही बहिणींच्या अंगावर सेम ड्रेस आहे. दुसरा फोटो नजिकच्या काळातला आहे. यात दोन्ही बहिणी व्यासपीठावर बसलेल्या आहेत आणि काही तरी संवाद त्यांच्यात सुरु आहे. त्यामध्ये, पंकजा काहीतरी सांगतायत आणि प्रीतम मुंडे मन लावून ऐकताना दिसतायत. तिसरा फोटो हा पुन्हा एका व्यासपीठावरचाच आहे. 

दरम्यान, नेहमीच वडिलकीची जबाबदारी तू पार पाडतेयस, लहान होते तेव्हाही आणि आजही तूच जबाबदारीच्या भूमिकेत आहेस, असे म्हणत पंकजा यांच्या त्यांच्या जीवनातील स्थानच अधोरेखीत केले आहे.  

टॅग्स :प्रीतम मुंडेपंकजा मुंडेमुंबई